बीड जिल्ह्यात संचारबंदी

 

बीड

in article

beed news sancharbandi मराठा आरक्षणाच्या संदर्भात बीड जिल्ह्यामध्ये होत असलेल्या सर्वत्र जाळपोळीच्या घटना पाहता जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी बीड जिल्हा मुख्यालय व सर्व तालुका मुख्यालयापासून 5 किमी  हद्दीपर्यंत व तसेच सर्व राष्ट्रीय महामार्गावर संचारबंदी लागू करत असल्याचे आदेश दिले आहे.

मराठा समाजात सरसकट कुणबी आरक्षण देण्याच्या संदर्भात जिल्ह्यातील विविध भागात आंदोलन आणि उपोषण चालू आहेत. दिनांक 29 च्या मध्यरात्रीपासून आंदोलनाने उग्र स्वरूप धारण केले आहे जिल्ह्यात मंडळ व इतर शासकीय अधिकाऱ्यांच्या वाहनास आग लागण्याचे प्रकार घडले आहेत.
आंदोलकांनी जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयावर मोर्चे काढून कार्यालय बंद पाडली तसेच काही ठिकाणी पुणे आणि दगडफेक करणे असे प्रकार घडले आहेत यामुळे सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

माजलगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळुंके यांच्या घराला आग लावण्यात आली तसेच मोठ्या प्रमाणावर दगडफेक करून नुकसान करण्यात आले त्याचबरोबर माजलगाव नगर परिषदेच्या कार्यालयाला ही आग लावण्यात आली.

बीड जिल्ह्यातील विविध तालुक्यात आणि रस्त्यांवर टायर जाळून आंदोलनकर्त्यांनी रस्ते बंद पाडले.
बीड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय तसेच माजी आमदार जयदत्त क्षीरसागर आणि काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर बंगल्यालाही आग लावण्यात आली. शहरातील इतर दुकाने आणि घरांनाही याचा फटका बसला आहे.

या सर्व गोष्टीचे अवलोकन करून मुंडे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 2 अन्वे एकतर्फी लागू केली आहे.

गेल्या दोन दिवसापासून बीड जिल्ह्यातील एसटी परिवहन महामंडळाच्या बस बंद आहेत इतर जिल्ह्यातून या जिल्ह्यात येणाऱ्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here