बस स्थानकावरून महिलांच्या गळ्यातले सोन्याचे दागिने हिसकावणाऱ्या चोरांना केले जेरबंद

बस स्थानकावरून महिलांच्या गळ्यातले सोन्याचे दागिने हिसकावणाऱ्या चोरांना केले जेरबंद

 

in article

आष्टी

 

Beed lcb news बस स्थानकावर बसच्या प्रतीक्षेत असलेल्या महिलांचे गळ्यातली बळजबरीने हिसकावून नेल्याचा प्रकार आष्टी बस स्थानकावर घडला होता. यासंदर्भात दिलेल्या महिलेच्या फिर्यादीवरून बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने तपास करून या दोन जबरी चोरी करणाऱ्यांना माळशेज घाटा मधल्या बंद हॉटेलमधून ताब्यात घेतले.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की फिर्यादी विजया विश्वनाथ शिंदे राहणार प्राध्यापक कॉलनी मुर्शिदपूर आष्टी यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण बळजबरीने हिसकावून नेल्याची फिर्याद त्यांनी आष्टी पोलीस ठाण्यात दाखल केली होती.

गुन्हा घडल्यानंतर गुन्हे शाखेच्या बीडच्या पथकाने घटनास्थळाला भेट देऊन याची माहिती घेतली असता आरोपी गणेश दिनकर झिंजुर्डे व किशोर भाऊसाहेब शेळके दोघेही राहणार पाथर्डी तालुका यांनी हा गुन्हा केला असल्याची माहिती मिळाली.

या आरोपींचा माग काढला असता पोलिसांना हे आरोपी कोल्हापूरच्या दिशेने गेले असल्याची माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या या पथकाने कोल्हापूर येथे जाऊन तपास केला असता आरोपींना पोलिसांचा संशय आल्यानंतर आरोपी सातारा कराड मार्गे कल्याण येथे गेले. अहमदनगर कल्याण रोडवर माळशेज घाटामध्ये बंद असलेल्या हॉटेलमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी जाऊन खात्री  केली असता या आरोपींनी  गुन्हा केल्याची कबुली दिली.

या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन तपासकामी आष्टी पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात दिले आहे. ही कामगिरी वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश वाघ पोलीस उपनिरीक्षक भगतसिंग दुलत पोलीस हेडकॉन्स्टेबल मनोज वाघ पोलीस नाईक सोमनाथ गायकवाड विकास वाघमारे सलीम शेख अशोक सुरवसे अशोक कदम यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here