मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शशिकांत कुलथे यांचा सत्कार

मराठवाडा शिक्षक
मराठवाडा शिक्षक

 

 

in article

बीड

राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार पटकावून महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात मानाचा तुरा खोवणारे बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र आदर्श शिक्षक शशिकांत कुलथे यांचा मराठवाडा शिक्षक संघा कडून यथोचित सत्कार करण्यात आला.

जिल्हा परिषद, अनुदानित शाळा आणि शिक्षकांना बदनाम करण्याचे पध्दतशीर प्रयत्न जाणीवपूर्वक सुरू असताना वाडी- तांड्यावर प्रभावी अध्यापन करून बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र शशिकांत कुलथे आणि सोमनाथ वाळके या जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांनी अशा प्रवृत्तींना चोख उत्तर दिले असल्याची भावना यावेळी मराठवाडा शिक्षक संघाचे विभागीय सरचिटणीस राजकुमार कदम यांनी व्यक्त केल्या.

यावेळी मराठवाडा शिक्षक संघाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा मार्गदर्शक डी. जी. तांदळे, जिल्हाध्यक्ष कालिदास धपाटे, जिल्हा सचिव गणेश आजबे, तालुकाध्यक्ष युवराज मुरूमकर, उपाध्यक्ष मुकुंद मोटे, तालुका सचिव विनोद सवासे, शहर कार्याध्यक्ष मोहन शेळके, सहसचिव प्रभाकर उंबरे, रमेश गायकवाड, मुख्याध्यापक राजेंद्र खेडकर यांची उपस्थिती होती.

अधिक वाचा : आमदार प्रशांत बंब यांचा मराठवाडा शिक्षक संघाकडून निषेध 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here