ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे प्रेरणास्त्रोत-विजयकुमार बांदल अण्णा

vijaykumar bandal
vijaykumar bandal

 

लेखन आणि संकलन : प्रा.सुभाष गांगर्डे

in article

vijaykumar bandal स्वातंत्र्योत्तर काळात समाज कसा असावा याचा विचार तत्कालीन काहीच लोकांनी केला त्यापैकी एक व्यक्तिमत्व म्हणजे विजयकुमार बांदल उर्फ अण्णा होय.

शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या विजयकुमार धोंडीराम बांदल यांनी आपले वडील नगरमध्ये एका व्यापाऱ्याकडे नोकरी करताना होत असलेल्या हाल अपेष्टा जवळून पहिल्या. आणि तेंव्हापासूनच ठरविले कि, ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील मुलांना शिक्षण मिळाले पाहिजे.तरच त्यांची आर्थिक प्रगती होईल.

भारताला प्रजासत्ताक गणराज्याच्या दर्जा मिळाला तेंव्हा विजकुमार यांचा जन्म झाला. बालपणीच नगर हातोळन धानोरा असा त्यांचा जीवन प्रवास सुरु झाला. परिस्थिती बिकट असतानाही त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हातोळन येथे सुरु केले.

त्यानंतर पुढच्या प्राथमिक शिक्षणासाठी ते जिल्हा परिषद धानोरा येथे आले. आपलं प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अहमदनगर येथील रेसिडेन्शिअल हायस्कूलमध्ये आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण केले.

स्वतःचे शिक्षण घेता घेता समाजाचे शिक्षण झालं पाहिजे, समाजाला यामधून फायदा झाला पाहिजे आणि समाजामध्ये जाणीव जागृती निर्माण झाली पाहिजे याच दृष्टिकोनातून धानोरा येथे त्यांचे वडील धोंडीराम बांदल यांनी आपल्या सहकाऱ्यासोबत जनता वसतिगृह सुरु केले.वडिलांचे शिक्षणाचे हे काम त्यांनी बालवयातच जवळून पहिले.

आज या छोट्याशा रोपट्याचा वटवृक्ष झाला आहे. या वटवृक्षांमध्ये विजयकुमार बांदल यांचा सिंहाचा वाटा असे म्हटले तरी चालेल.

माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी बीड येथील बलभीम महाविद्यालयात त्यांनी आपले पदवी पर्यंत शिक्षण पूर्ण केले. सहाजिकच समाजकार्याची आणि राजकारणाची आवड असल्यामुळे त्यांनी अहमदनगर कॉलेजमधील डीएसडब्ल्यू म्हणजेच समाजकार्य पदविका यासाठी प्रवेश घेतला.

Gandhi jayanti special 2021:गांधीजीं स्मृती जतन करणारे गाव

हा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्यांनी मुंबई येथे इंटरनॅशनल कौन्सिल ऑन सोशल वेल्फेअर या संस्थेमध्ये एक वर्ष नोकरी केली. ग्रामीण भागातील विद्यार्थी नोकरीच्या निमित्ताने मुंबई येथे गेल्यानंतर तिथे ते फार काळ रमले नाहीत. मुळताच समाजकार्याचा आणि राजकारणाचा पिंड असलेले बांदल यांनी नोकरी सोडून गावाकडे म्हणजेच धानोरा येथे येण्याची ठरवले.

नोकरी करत असताना त्यांना कडा येथील सहकारी साखर कारखान्यात एक वर्षाची नोकरी करण्याची संधी मिळाली. या नोकरीच्या कालावधीमध्ये त्यांनी आष्टी तालुक्यातील राजकारणाचा जवळून अभ्यास केला.तत्कालीन आमदार, खासदार आणि सहकारी क्षेत्रातील अभ्यासू यांच्याबरोबर कार्य करत त्यांना या सगळ्या गोष्टींचा चांगला फायदा झाला.

कडा सहकारी साखर कारखान्यात एक वर्ष नोकरी केल्यानंतर त्यांनी या नोकरीचा त्याग केला आणि थेट राजकारणात प्रवेश केला. सुरुवातीला कडा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापतीपद त्यांनी 1987 ते 1997 या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये भूषविले. कडा कृषी उत्पन्न बाजार समिती आज नावारूपाला आली आहे.या बाजार समितीच्या नावारुपाला येण्याच्या मागे विजयकुमार बांदल यांचेही श्रेय आहे.

त्या काळामध्ये शेतकऱ्यांना पूरक अशा प्रकारच्या ध्येय धोरणाचा अवलंब त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीत केला.शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बाजार भाव मिळाला पाहिजे, त्याचबरोबर शेतकऱ्यांची उत्पन्न कसं वाढेल यासाठी बाजार समितीच्या माध्यमातून त्यांनी प्रयत्न केले.

Makhana in Marathi स्वादिष्ट मखाना खीर

याच दरम्यान 1992 ते 1997 त्यांनी आष्टी पंचायत समितीचे सभापती पद भूषविले.पंचायत समितीचे सभापती झाल्यानंतर त्यांनी ग्रामीण भागातील विविध समस्यांवर लक्ष द्यायला सुरुवात केली. पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेला मूलभूत सुविधा कशा प्राप्त होतील याचा त्यांनी विचार केला.

त्याचबरोबर शिक्षकांचे प्रश्न प्रामुख्याने सोडवण्याचा प्रयत्न केला.पंचायत समिती सभापती असताना दरम्यानच्या काळात आपल्या वडिलांच्या शिक्षण कार्याची धुरा त्यांनी खांद्यावर घेतली.

धानोरा येथे त्या काळामध्ये शिक्षणाच्या सुविधा अपुऱ्या होत्या आणि गावांमध्ये फक्त जिल्हा परिषद ची प्राथमिक शाळा आणि जनता विद्यालय होते. वडिलांचा शैक्षणिक कार्याचा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी ते सन 2001 मध्ये जनता वसतिगृह शिक्षण संस्थेचे सचिव झाले.

ते सचिव झाल्यानंतर या संस्थेची भरभराट मोठ्या प्रमाणात सुरू झाली. संस्थेच्या अनेक शाखा सुरू झाल्या. यामध्ये जनता विद्यालयाचे विस्तारीकरण, उच्च माध्यमिक विद्यालय,वरिष्ठ महाविद्यालय, रोडेश्वर विद्यालय, हिवरा-पिंपरखेड आणि जॅक अँड जिल स्कूल या सर्व शिक्षण संस्थांचा समावेश आहे.

vijaykumar bandal

आज या शिक्षण संस्थांमध्ये दोन ते अडीच हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय व्हावी आणि त्यांचे भवितव्य उज्वल व्हावे याच दृष्टिकोनातून या संस्थेची पायाभरणी झाली आणि हाच हेतू पुढे ठेवून विजयकुमार बांदल यांनी आपली वाटचाल सुरू केली.

आज ते वयाची 72 वर्षे पूर्ण करत आहेत. आजही तितक्याच जोमाने,तितक्याच उत्साहाने ते या शिक्षण संस्थाची धुरा सांभाळत आहेत. शिक्षण संस्था चालवत असताना समाजकारण,राजकारण संस्थेमध्ये असलेली विविध नोकर कर्मचारी या सर्वांशी समन्वय साधून आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी कशा उपलब्ध होतील यासाठी त्यांनी नेहमीच प्रयत्न करत आहेत.

या उज्वल कार्यात त्यांना संस्थेचे अध्यक्ष सय्यद अब्दुलभाई,संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि कर्मचारी आणि त्यांचा मित्रपरिवार ग्रामस्थ यांचे अनमोल सहकार्य मिळत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here