राजीनामा देणे योग्य – मारुती शेंगाळ

मारुती शेंगाळ

अहमदनगर – आदिवासी समाजाच्या हितापेक्षा माझे राजकीय पक्षाचे पद मोठे नाही.राष्ट्रवादी पक्षाची विचारधारा चांगली आहे मात्र लोकप्रतिनिधीmaruti त्या योग्यतेचे नाही,त्यांची कार्यकर्त्यांना वागणूक देण्याची पद्धत योग्य नाही अशी टीका करीत मी लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस आदिवासी सेलच्या सरचिटणीस पदाचा राजीनामा देणार असल्याचे मारुती शेंगाळ यांनी सांगितले. 

      श्री शेंगाळ पुढे म्हणाले की, आदी वासी गरीब जनतेचे धान्य स्वतःचा नातेवाईक असलेला व राष्ट्रवादी पक्षाचा उपाध्यक्ष असलेला काळ्या बाजारात विक्रीला जात असताना स्वतःला आदिवासींचा मसीहा समजणारे लोकप्रतिनिधी डॉ.किरण लहामटे हे शांत आहे. हे सहन होण्याच्या पलीकडे आहे.यापूर्वी दोन घटना घडल्या आहेत . दीपक वैद्य सारख्या प्रामाणिक कार्यकर्त्याला देखील अंगावर धावून जाने हे प्रामाणिक माणसावर अन्याय आहे . या सर्व बाबींचा विचार करून मी राजीनाम्याचा विचार केला आहे . माझ्यासोबत माझे कार्यकर्ते , नातेवाईक माझ्या भूमिकेसोबत आहे . 

      आदिवासी समाजाबरोबरच कोणत्याही जाती,धर्म,समाज तसेच सर्वसामान्य माणूस यांवर होणारा अन्याय अत्याचार मला मान्य नाही.

याहीपुढे मी असाच सर्वसामान्य लोकांवर,गोरगरीब जनतेवर होणाऱ्या अन्याय,अत्याचार याला विरोध करत राहील.चुकीच्या गोष्टी विरोधात नेहमीच आवाज उठवत राहील.हीच न्यायप्रिय भूमिका माझी नेहमीच राहील.

       या सर्व बाबींचा विचार करून मी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस आदिवासी सेलच्या सरचिटणीस पदाचा येणाऱ्या दोन तीन दिवसांत राजीनामा देत आहे.असे राष्ट्रवादी काँग्रेस आदिवासी सेल चे सरचिटणीस तथा

आदिवासी कर्तव्यदक्ष संघटना,महाराष्ट्र राज्य चे कार्याध्यक्ष मारुती शेंगाळ यांनी सांगितले.

Anil deshmukh,अखेर इडी ने केली अनिल देशमुख यांना अटक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here