राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष गोदामपाल यास राजूर पोलिसांची अटक

गोदामपाल

अहमदनगर

स्वस्थ धान्य प्रकरणातील  सब ठेकेदार असून न्यायालयासमोर उभे केले असता एक दिवसाची पोलीस कष्टडी देण्यात आल्याची माहिती तपास  अधिकारी नितीन खैरनार यांनी दिली आहे . यापूर्वी चार वाहन चालकांना अटक केली असून त्यांना १७ तारखे पर्यंत कष्टडी देण्यात आली आहे . या अटकेनंतर तालुक्यात प्रतिक्रिया उमटू लागल्या असून आदिवासी संघटनांनी तसेच राष्ट्रवादी पक्षाचे आदिवासी सेलचे अध्यक्ष अशोक माळी सचिव मारुती शेंगाळ यांनी तहसीलदार याना भेटून संबंधित अधिकारी ठेकेदार यांची कसून चौकशी करावी प्रकरण सैल केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे . तर मंगळवारी आदिवासी संघटना आक्रमक पवित्र घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे . आज न्यायालयात गोदामपाल भाऊसाहेब गंभिरे यांना चक्कर आल्याने पोलिसांची मात्र धावपळ उडाली आहे .

in article
राजूर पोलिसांनी बुधवारी दुपारी अनधिकृत ? वाहनांतून नेत असलेले  धान्य शनिवारी प्रांताधिकारी यांच्या आदेशानुसार अकोले येथील शासकीय गोदामात उतरविण्यात आले.या चारही वाहनांतील एकूण धान्य साठा बरोबर असला तरी वाहनांमध्ये असलेल्या धान्य साठ्यात तफावत  असल्याचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नितीन खैरनार यांनी सांगितले. यावेळी पोलिसांनी  गोदामपाल  पोलीस चौकशी करिता ताब्यात घेतले असून त्यांचा लेखी जबाब घेण्याचे काम सुरू होते .याच प्रकरणी  पोलिसांनी रात्री उशिराने संतोष परते या सब डीलरलाही ताब्यात घेतले व न्यायालयासमोर रविवारी हजर केले असता एक दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे .
      गुरुवारी रात्री या चारही वाहनचालकांना राजूर पोलिसांनी अटक करून शुक्रवारी न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने या चौघांनाही १७ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.शुक्रवारी सायंकाळी पाऊस आल्यामुळे प्रांताधिकारी यांचे आदेशानुसार या चारही ट्रक मधील माल अकोले येथील शासकीय गोदामात पोलिसां समक्ष उतरविण्यात आला.प्रत्येक गाडीत असणारा धान्य साठा खाली करत असताना त्यात असणारा माल आणि पावत्यांवर नोंदविण्यात आलेल्या मालात कमी अधिक असल्याचे पोलिसांना आढळून आले.चारही ट्रक मिळून असलेले एकूण धान्य मात्र यावेळी बरोबर असल्याचे पोलीस उपनिरीक्षक खैरनार यांनी सांगितले. मात्र मार्ग ठरवून दिलेल्या वाहनांत कमी अधिक माल कसा निघाला हा प्रश्न निर्माण झाला आहे.
      रेशनिंगचा माल पुरविणाऱ्या वाहनांची माहिती,अधिकृत ठेकेदार या व इतर आवश्यक असणाऱ्या माहिती बाबत तहसीलदार यांना पत्र दिले आहे.  शनिवार असल्याने ही माहिती त्यांना मिळाली नाही.रजिस्टरच्या सत्यप्रति तसेच ताब्यात घेण्यात आलेल्या चारही ट्रक संदर्भातील माहिती वाहन प्रादेशिक अधिकारी(आर टी ओ  )यांच्या कडे मागविण्यात आले असल्याचे सपोनि नरेंद्र साबळे व तपास अधिकारी खैरनार यांनी सांगितले  आरोपी संतोष परते हे  आमदार डॉ . किरण लहामटे यांचे उजवे हात समजले जातात . राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते अशोक भांगरे  यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केल्याचे विश्वसनीय वृत्त आहे . यापूर्वी असलेला ठेकेदार याला काढून संतोष परते यांना ठेका देण्यासाठी आमदार यांनी मदत केली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे . आदिवासी भागात त्यामुळे नाराजी व्यक्त  होत आहे . राष्ट्रवादीचे  दीपक वैद्य , अशोक माळी, मारुती शेंगाळ ,सौ . मनिक्षा शेंगाळ  शिवसेनेचे बाजीराव दराडे , मारुती मेंगाळ यांनी तहसीलदार यांना निवेदन दिले आहे

अटक झाल्यानंतर शिवसेनेचे बाजीराव दराडे , माजी उपसभापती मारुती मेंगाळ , भाजपचे तालुका अध्यक्ष सीताराम भांगरे , भाजपचे गट नेते जालिंदर वाकचौरे , तर ग्राहक मंचाचे मच्छिन्द्र मंडलिक यांनी या प्रकरणातील वरिष्ठ अधिकारी यांची चौकशी करून पोलिसांनी कोणत्याही दबावाला बळी न पडत तपस करावा अशी मागणी केली आहे . तर राष्ट्रवादी पक्षाचे तालुका अध्यक्ष भानुदास तिकांडे  यांनी राष्ट्रवादी पक्षाची भूमिका विशद करताना गुन्हेगार हा कोणत्या पक्षाचा आहे याला महत्व नाही राष्ट्रवादीची व लोकप्रतिनिधी यांची भूमिका चुकीच्या गोष्टीला समर्थन करण्याचे नाही .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here