गोंदियात भगत की कोठी ट्रेन चा अपघात

0
20

गोंदिया

रायपुर कडून नागपुरच्या दिशेने जाणाऱ्या “भगत की कोठी” ट्रेनला गोंदिया शहरा जवळ अपघात झाला आहे.

in article

एकाच ट्रॅक वर समोर जात असलेल्या मालगाडीला भगत की कोठी ट्रेन ने मागून धड़क दिल्याने हा अपघात झाला आहे. या मध्ये भगत की कोठी ट्रेन च्या एक ‘एस 3’ डब्बा रुळाखाली घसरला.
अपघातात 53 च्या वर लोक जखमी तर 13 किरकोळ जखमी झाले आहे.

सर्व जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालय व तसेच खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. मध्य रात्री 2 च्या सुमारास हा अपघात घडला असुन एकाच ट्रेक वर दोन ट्रेन नागपूर च्या दिसेने जात होत्या भगत च्या कोठी ट्रेन ला ग्रिन सिग्नल मिळाल्याने हि गाडी समोर निघाली होती.

मात्र याच रुडावर भगत की कोठी च्या समोर मालगाडी चालत होती. आणि तिला समोर जाण्याच्या सिग्नल न मिळाल्याने ती थांबलेली होती. गोंदिया शहराला लागून असलेल्या रेल्वे गेट वर सिगनल व्यवस्थित न मिळाल्याने भगत कोठी या ट्रेन ने मालगाडीला मागवून दिली अशी माहिती पुढे येत आहे.

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here