जवाहर नवोदय विद्यालयात 19 विद्यार्थी कोरोना बाधित

0
167
जवाहर नवोदय

 

अहमदनगर

in article

जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील जवाहर नवोदय विद्यालयातील १९ विद्यार्थी कोरोना बाधित आढळले असून यामध्ये पारनेर, संगमनेर, श्रीगोंदा, श्रीरामपूर, नगर येथील विद्यार्थ्यांचा समावेश यामध्ये आहे.अशी  माहिती जिल्हाधिकारी डॉ  राजेंद्र भोसले यांनी दिली.

 

इयत्ता दहावी व बारावीची अनेक विद्यार्थी परीक्षेसाठी नवोदय विद्यालय मध्ये बाहेरून आले होते. त्यामुळे या विद्यार्थ्यांकडून बाधा झाली असण्याची शक्यता नवोदय विद्यालयाच्या प्रशासन व पारनेर आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे. या नवोदय विद्यालयातील ९ विद्यार्थ्यांना गुरुवारी कोरोना सदृश्य आजाराची लक्षणे आढळल्याने त्यांची तपासणी टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.

त्यामुळे या विद्यालयातील विद्यार्थ्यांना कोरोणाची बाधा झाल्याचे तपासणीत आढळून आल्याने उर्वरित विद्यार्थी तपासणी शुक्रवारी सकाळी केली असता १० विद्यार्थ्यांना कोरोना बाधित व एका संगीत शिक्षकाला गुरुवारी बाधा झाली असल्याचे तपासणी अहवालात आढळून आले आहे. त्यामुळे या १९ जणांना पारनेर ग्रामीण रुग्णालयातील शासकीय कोव्हिड सेंटरमध्ये आरोग्य विभागाने  उपचारासाठी दाखल केले आहेत.

 

या घटनेची माहिती समजताच तहसीलदार शिवकुमार आवळकंठे, गटविकास अधिकारी किशोर माने यांच्यासह तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रकाश लाळगे, वैद्यकीय अधीक्षक डॉ सतीश लोंढे, डॉ अन्विता भांगे, डॉ स्वाती ठुबे या आरोग्य विभागाच्या पथकाने तातडीने ४१० जणांचे नमुने घेण्यास सुरुवात केली असून यापैकी २०० जणांचे नमुने तपासून झाले असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या टाकळी ढोकेश्वर येथील जवाहर नवोदय विद्यालयातील दोन दिवसात १९ कोरोना बाधित आढळून आल्याने विद्यार्थी व पालकांचे तसेच शिक्षकांचे धाबे दणाणले आहे.

जवाहर नवोदय विद्यालयात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांची पण तपासणी

त्यामुळे विद्यार्थ्यांना तपासणीसाठी व  उपचारा दाखल करण्यासाठी पालकांनी विद्यालयात एकच गर्दी केली आहे. जवाहर नवोदय विद्यालयातील विद्यार्थी संख्या ४१० च्या आसपास असून या विद्यालयात जवळपास ७० ते ८० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना बरोबर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांची पण तपासणी करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार शिवकुमार आवळकंठे व गटविकास अधिकारी किशोर माने यांनी दिली आहे.

 

नगर बीड परळी रेल्वेसाठी राज्य शासनाकडून एकूण 1413 कोटी रुपये मंजूर

 

 

 

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here