स्त्री शिक्षणाच्या पुरस्कर्त्या : प्राचार्या मंजुषा काळे

प्राचार्या मंजुषा काळे

*स्त्री शिक्षणाच्या पुरस्कर्त्या : प्राचार्या मंजुषा काळे* 

स्त्रीला दुर्गेचा अवतार मानला जातो. आधुनिक माहिती आसनी तंत्रज्ञानाच्या युगातही महिलांनी आपल्या कर्तृत्वावर यशाची शिखरे पादाक्रांत केलेली असल्याचे अनेकदा पाहिलेले आहे. सामाजिक, सांस्कृतिक, कृषी, प्रशासकीय, न्याय, क्रीडा, राजकीय, व्यवसाय ते गृहिणी अशा कितीतरी क्षेत्रांत महिला उत्तमरीत्या काम करत आहे. विशेषतः बुरसटलेल्या समाजव्यवस्थेतही कर्तृत्व आणि नेतृत्वाने नेटाने पुढे जाऊन काम करत आहे. असेच शैक्षणिक क्षेत्राबरोबर सामाजिक कार्यात योगदान देणाऱ्या अकोले तालुक्यातील अतिदुर्गम भागातील राजूर येथील समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची प्राचार्य पदाची धुरा यशस्वीरीत्या सांभाळणाऱ्या प्राचार्या मंजुषा काळे यांच्या जीवनकार्याचा जागतिक महिला दिन (ता.८) निमित्त घेतलेला छोटासा धांडोळा.

आणखी वाचा :शेतकरी आणि ग्रामीण महाराष्ट्रासाठी निराशाजनक अर्थसंकल्प – आमदार राम सातपुते

आदिवासीबहुल परिसरातील लोकांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाशदीप सदोदीत तेवत ठेवण्यासाठी वेळप्रसंगी खस्ता खाऊन त्यांचे  जीवनमान उंचविण्यासाठी प्राचार्या मंजुषा काळे काम करत आहे. ‘एक मुलगी शिकली तर संपूर्ण कुटुंबाला सुशिक्षित करते’ याप्रमाणे प्राचार्या काळे यांनी अनेक मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहे. पवित्र ज्ञानदानाचे काम करून अनेक मुली विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करत आहे. याबरोबरच अनिष्ठ प्रथा ‘बालविवाह’ रोखून पालकांचे प्रबोधन करत आहे. अन्याय-अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवून अनेकांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करत आहे. युवती सक्षमीकरणच्या माध्यमातून अनेक प्रबोधन वर्ग सुरू केले आहेत. यामुळे अनेक युवती स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभ्या राहिल्या आहेत. महिला बचत गटांच्या माध्यमातून अनेक महिलांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे. आदिवासी भागातील मुलींना दत्तक घेऊन त्यांनी उपेक्षित वर्गाला शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे.

प्राचार्या मंजुषा काळे

आपल्याच विद्यालयातील अनेक गरीब मुलांना मोफत शिक्षण देत आहे.  मुली अति शिकल्या तर संसार होत नाही; पण मुलांनाही शिकलेल्या मुली बरोबर कसा संसार करायचा हे त्या नेहमी आपल्या वर्गात शिकवत असतात. त्यांचा हा सामाजिक परिवर्तनाचा लढा अविरतपणे चालू ठेवण्यासाठी त्यांना पतीचीही उत्तम साथ मिळत आहे.स्मार्टगर्ल , माणुसकीची शाळा ,युवती सवांद ,यामाध्यमातून त्यांनी मुली, महिला , युवक , वृद्ध यांच्याशी सवांद साधून अंधश्रद्धा , व्यसनाधीनता ,महिलांचे हक्क यावर लिखाण केले ,तर आदिवासी खेड्यात वाडी वस्तीवर जाऊन शाळाबाह्य विधार्थ्याना शिक्षणाच्या प्रवाहात आणले , श्री स्वामी समर्थ शिक्षण संस्थेच्या माध्यमातून एक हजार विधार्थ्याना त्यांनी ज्ञानदानाचे काम अविरतपणे सुरु ठेवले आहे . हरीस्चन्द्र्गड , कळसुबाई शिखरावर असलेले प्लास्टिक विधार्थ्यान्मार्फात एकत्र करून त्याची  विल्हेवाट लावली, तर चिमणी प्रकल्प राज्यभरातून कौतुक झाले

प्राचार्या मंजुषा काळे

.  याची अनेक संस्था व व्यक्तींनी दखल घेऊन पुरस्कार देत अधिक काम करण्यास ऊर्जा दिली आहे. याच जोरावर आदिवासी भागातील समाज मन नक्कीच परिवर्तनाच्या वाटेवर येऊन प्रगती करतील अशी अपेक्षा व्यक्त करूया. त्यांच्या या कार्याला महिला दिनानिमित्त मानाचा सलाम आणि शुभेच्छा.

 

अतिवृष्टी च्या अनुदान मिळावे यासाठी रस्ता रोको

bio disel,बेकायदेशीररित्या विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

in article

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here