अकोले तालुक्यात पट्टेरी वाघ आढळला

 

 

in article

tiger found in akole ahmednagar अकोले तालुक्यात पट्टेरी वाघ आढळला

अकोले,

tiger found in akole ahmednagar वनविभाग नाकारत जरी असले तरी अकोले तालुक्यात पट्टेरी वाघ असल्याचे दिसून आले आहे .कुमशेत,बारी,आढला परिसरात अनेकांना हा पट्टेरी वाघ दिसला असतानाही वनविभागाचे अधिकारी आपल्या भागात पट्टेरी वाघ नसल्याचे सांगून आपल्यावरील जबाबदारी झटकत असले तरी दस्तुर खुद्द सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण दातरे नुकत्येचं  रात्रीची ड्युटी बजावत असताना सुगाव नर्सरी परिसरात त्यांच्या गाडीला हा पट्टेरी वाघ आडवा गेला त्यावेळी त्यांनी आपल्या मोबाईल मध्ये त्याचे चित्रण केले आहे .
याबाबत तालुक्यात जोरदार चर्चा असून  त्यामुळे वनविभागाची धावपळ उडाली आहे .

अकोले तालुक्यातील अनेक ठिकाणी बिबट्याने धुडगूस घातला असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे शेळ्या  कोंबड्या ,कुत्रे,जे मिळेल ते हे बिबटे शिकार करून दहशत माजवत आहे.जंगलात खायला नसल्याने बिबटे सायंकाळी सात वाजता मनुष्य वस्तीकडे येतात चिंचोडी येथे सायंकाळ सात वाजता येऊन त्याने कुत्र्याची शिकार केल्याचे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहे.

तर शिरपुंजे येथे शेळ्या व कोंबड्या ठार केल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थ चंद्रकांत धिंदले यांनी दिली आहे त्यातच सुगाव परिसरात पट्टेरी वाघ दिसल्याने वनविभागाच्या कारभाराबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे .

सहायक पोलिस निरीक्षक प्रविन दातरे यांनी सांगितले की, रात्रीच्या वेळी अकोलेहून संगमनेर च्या दिशेने जात असताना माझ्या गाडीच्या प्रकाशात मला मोठा पट्टेरी वाघ दिसला. त्याचे छायाचित्रे मी मोबाईल मध्ये कैद केले आहे ,काढलेला व्हिडीओ पत्रकार मित्रांनाही दाखवला आहे.

सयाजी अस्वले( सरपंच कुमशेत) काही महिन्यांपूर्वी कुमशेत परिसरात  पट्टेरी वाघ दिसला होता  याबाबत वांनविभागाशी संपर्क केला होता. तर बारी ते वासळी,इंदोरे, अलंग मलंग परिसरातही पट्टेरी वाघ दिसल्याचे स्थानिक ग्रामस्थांचे मत आहे.

निसर्ग प्रेमी विनायक वाडेकर सह्याद्री परिसरात पट्टेरी वाघ असल्याची जोरदार चर्चा असून वनविभागाने तातडीने सर्च करून याबाबत गंभीर होण्याची आवश्यकता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here