जिल्ह्याच्या विकासासाठी सेवा करण्याची संधी द्या- पंकजाताई मुंडे

जिल्ह्याच्या विकासासाठी सेवा करण्याची संधी द्या- पंकजाताई मुंडे

 

in article

पंकजाताई मुंडेंना मताधिक्याने निवडून आणण्यासाठी आडसकर मैदानात

केज येथे कार्यकर्ता बैठक

केज दि १४(प्रतिनिधी)

Pankaja munde karykrata baithak  बीड  लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रचारार्थ केज येथे कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला.

भाजपाचे ज्येष्ठ नेते रमेशराव आडसकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अंकुशराव इंगळे, केज नगरपंचायतच्या नगराध्यक्ष सीताताई बन्सोड, जनविकास आघाडीचे हारूनभाई इनामदार, यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी मंचावर उपस्थित होते.

पुढे बोलताना मुंडे म्हणाल्या संसदेमध्ये थेट पंतप्रधानांच्या पुढे बसून अनेक प्रश्न मार्गी लावायचे आहेत. विकासासाठी पंखांना बळ द्या. जिल्ह्यातील बेरोजगारी दूर करण्यासाठी दहा हजार लोकांना रोजगार देणारा उद्योग उभा करणार आहे.

जिल्ह्यात कॅन्सर हॉस्पिटल उभा होऊन जनतेची सोय होईल .जिल्ह्याचा पाण्याचा कायमचा प्रश्न सोडवणार आहे.बीड रेल्वेचे स्वप्न पूर्ण करणार आहे. आम्ही जातीपातीचे राजकारण करत नाही.आरक्षणाचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. सर्व समाजाने मताधिक्याने निवडून देऊन सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले .

विरोधी पक्षातील उमेदवार आता मत मागत आहेत
कोरोनामध्ये हे उमेदवार कुठे होते ? मागील लोकसभेत पराभूत झाल्यानंतर पुन्हा लोकांमध्ये ते कधीच आले नाहीत अशी टीका केली.

 

रमेशराव आडसकर म्हणाले की,
स्व गोपीनाथ मुंडे यांनी मराठा आरक्षणासाठी प्रयत्न केले होते. हे विसरून चालणार नाही. ग्रामीण भागाच्या विकासासाठी मुंडे कुटुंबाचे मोठे काम आहे. विकासासाठी मोठा निधी उपलब्ध होत आहे.आम्ही खंबीर ताकतीने साथ देऊन पंकजा मुंडे त्यांना सभागृहात पाठवणार आहोत असा विश्वास व्यक्त केला.

मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न गोपीनाथराव मुंडे यांनी मांडला होता असे मत हरून भाई इनामदार यांनी व्यक्त केले. मुस्लिम समाज पंकजा ताईंना मोठ्या संख्येने निवडून आणणार अशी ग्वाही दिली
स्व बाबुरावजी आडसकर यांनी जनतेशी जोडलेली नाळ रमेशराव आडसकर यांनी टिकवून ठेवली आहे. आडसकरांचा कार्यकर्ता वर्ग मोठ्या तालुक्यात मोठ्या प्रमाणात आहे. ग्रामपंचायत सेवा सहकारी सोसायटी या माध्यमातून जनतेचे जोडलेले असतात .केज विधानसभा मतदारसंघात दांडगा जनसंपर्क आहे. कार्यकर्ता मेळाव्यास मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. कार्यकर्ता बैठकीला सरपंच सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन ग्रामपंचायत सदस्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाल्याने बैठकीला सभेचे रूप आले. कार्यक्रमाचे प्रास्तविक ऋषिकेश आडसकर यांनी केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here