बस पेटली,धडकेत दोघांचा मृत्यू

nashik bus fire
nashik bus fire

 

नाशिक

in article

nashik bus fire  पुणे जिल्ह्यातल्या राजगुरू नगर होऊन नाशिक कडे येणाऱ्या बसने पुढे उभ्या असलेल्या बसला धडक दिल्याने झालेल्या अपघातात बस पेटल्याने अथवा दोन वाहनांच्या मध्ये दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना नाशिक पुणे महामार्गावरील पळसे गावाजवळ घडली.

याबाबत अद्याप पोलिसांकडून अधिकृत माहिती आलेली नाही. राजगुरुनगर येथून येणारी बस जळून पूर्ण खाक झाली असली तरी बसमधील प्रवासी सुखरूप असल्याचे सांगण्यात येत आहे .

याबाबत अधिक माहिती अशी की काही वेळापूर्वी राजगुरू नगर डेपोची नाशिककडे येणारी एसटी बस क्रमांक एम एच 07 सी70 81 नाशिक पुणे रस्त्यावर पळसे गावाजवळ आली असताना या बसच्या पुढे MH14 bt 36 35 क्रमांकाची सिन्नर डेपोची बस उभी होती त्या बसमधून प्रवासी उतरत असताना राजगुरुनगरच्या बसने समोर असलेल्या दोन दुचाकीला जोरात धडक दिल्याने ते दोघं या बस मध्ये दबले गेले समोरच्या बसला धडक दिल्यानंतर क्षणात राजगुरुनगरच्या बसने पेठ घेतला .

घटना घडल्याचे समजताच परिसरातील नागरिकांनी धाव घेत बसमधील प्रवाशांना बसच्या काचा फोडून सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळवले. मात्र दुचाकी वरील या दोघांचा अपघातात बळी गेल्याचे सांगण्यात येत आहे .

ही आग लागल्याची कायदाच अग्निशामन दलाच्या तीन बंबांनी घटनास्थळी धाव घेऊन आग वीजविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. घटनास्थळी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल शिंदे पोलीस निरीक्षक गणेश न्याहदे आणि अन्य वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी असून बचाव कार्याचे काम सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here