मराठ्यांची आरक्षणाची दिशाभूल नाही महादिशाभूल आहे -जरांगे

 

 

in article

जालना

Maratha reservation vishesh adhiveshan अधिवेशनाच्या अगोदर मनोज जरंगे पाटील यांनी राज्य सरकारकडे सगेसोयरे कायदाच करा.. सरकारला आरक्षण देऊन केवळ 5 ते 6 लोक खुश करायचे आहेत की कोट्यावधी मराठ्यांना फायदा होईल असे आरक्षण द्यायचे आहेत,.आमची मागणी ही ओबीसी मधून आरक्षणाची असून ज्यांच्या नोंदी नाही त्यांना सगेसोयरे कायदा करून आरक्षणाची आहे. त्याशिवाय पर्याय नाही. सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी न केल्यास उद्या पुन्हा आंदोलनाची घोषणा करावीच लागेल असा ईशारा जरांगे यांनी दिलाय.मराठ्यांची मागणी ही 50 टक्काच्या आतील आरक्षणाची असून तुम्ही दुसरं का देत आहे ही दिशाभूल नाही महादिशाभूल आहे हरकती वाचायला एवढा वेळ का लागतो त्या एका रात्रीत देखील वाचता येतात तुमचे लोक वाढवा आणि एका रात्रीत वाचा असा इशारा देखील जरांगे पाटलांनी दिलाय.

या विशेष अधिवेशनात सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी सुरुवातीला च करावी,नंतर मागासवर्ग आयोगाचा विषय चर्चेला घ्यावा,सरकारला विनंती आहे की,अगोदर सगे सोयरे विषय घेऊन त्यांची अंमलबजावणी करावी मराठा आमदार मंत्र्यांनी हा विषय लावून धरावा,ओबीसीतून आरक्षणाची मागणीही लावून धरावी जर आमदार मंत्र्यांनी असं केलं नाही तर ते मराठा विरोधी ग्राहय धरले जातील.

सगे सोयरे हा विषय किती महत्वाचा आहे हे सरकारला माहिती आहे.आता त्यांनी पुन्हा याबाबत माहिती करून घेऊ नये.ओबीसीतून आरक्षण ही कोट्यावधी मराठ्यांची मागणी आहे.सगे सोयरे कायदा करणार हा सरकारचा शब्द आहे आता त्यांनी यासाठी वेळ घेऊ नये.सगे सोयरे वर चर्चा केली नाही तर सर्वात मोठ्या आंदोलनाची घोषणा करणार,हे आंदोलन शांततेत होईल.
50 टक्क्यापेक्षा अधिक आरक्षण 2-4 जणांना हवं आहे हे आरक्षण देखील आमच्याच आंदोलनामुळे मिळत आहे पण सामान्य लोकांची मागणी ओबीसीतून आरक्षणाची आहे.50 टक्क्यावरील आरक्षण मागणारे कोण हे महाराष्ट्राला माहिती आहे
मराठ्यांची मागणी ओबीसीतून आरक्षणाची आहे.सगे सोयरे कायद्याची आहे.तुम्हाला 100-150 महत्वाचे की कोट्यवधी मराठे महत्वाचे हे तुम्हाला 21 तारखेला कळेल.आता सरकारशी माझी चर्चा झालेली नाही.शिष्टमंडळाशी चर्चा झालेली नाही.गे विमानाने देव देव करत बसत आहे तुम्ही फक्त अंमलबजावणी करू नका मग पश्चाताप करण्याची नवी व्याख्या तुम्हाला करावी लागेल असेही जरांगे म्हणाले.
50 टक्क्यावरील आरक्षण देऊन न्याय मिळणार नाही.मागच्या वेळी तेच झालं .ECBC मधील आरक्षनातून एकाची नोकरीत निवड झाली त्याची मिरवणूक निघाली तो अजूनही गावाकडे आहे.त्याच लग्न झालं नाही कारण त्याची नियुकी झाली नाही.हे आरक्षण उडेल अशी शंकाही त्यानी बोलून दाखवली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here