पहिल्यांदाच अहमदनगर मधून पुण्याला अवयव वाहतूक

Green corridor system in Ahmednagar
Green corridor system in Ahmednagar

 

अहमदनगर

in article

Green corridor system in Ahmednagar जिल्ह्यातील विळद घाट येथील विखे पाटिल हॉस्पिटल येथून युवकाचे 4 अवयव ग्रीन कॉरिडॉर च्या माध्यमातून पुणे येथील विविध  हॉस्पिटलमध्ये पोहचले जात आहे यामाध्यमातून चार व्यक्तींना या अवयवाचा लाभ होणार आहे.याबाबत ची माहिती खासदार डॉ सुजय विखे यांनी दिली.

अहमदनगर जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्र मध्ये ही प्रथमच घटना आहे.यापूर्वी या हॉस्पिटल च्या माध्यमातून आतापर्यंत तीन महिन्यांत 4 किडनी ट्रान्सप्लांट केले असल्याचे त्यांनी सांगितले.पुणे येथील सह्याद्री हॉस्पिटल आणि ज्युपिटर हॉस्पिटल आणि नाशिक येथील एका हॉस्पिटल येथे हे अवयव green energy coridor पाठवले जात आहेत.यामुळे चार रुग्णांना त्याचा फायदा होणार आहे.

जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील हा  युवक अविवाहित होता.

खाजगी  सुरक्षा कर्मचारी म्हणून काम करणारा 25 वर्षीय  युवकाचा  आळेफाटा येथे अपघात झाल्याने तो जखमी झाला होता. दरम्यान त्याचा  ब्रेन डेड झाला होता.नंतर त्याला आळेफाटा आणि संगमनेर येथे रुग्णालयात हलविण्यात आला होता.त्यांनतर त्याचा ब्रेन डेड झाल्याचे निदर्शनास आले.यासंदर्भात वैद्यकीय क्षेत्रातील नामवंतांचे मते घेण्यात आले होते.त्यांच्या मतानुसार ब्रेन डेड झाल्याचं सांगण्यात आले.त्यानुसार या युवकांच्या नातेवाईकांनी पुढाकार घेतल्याने 4 अवयव दान होत आहे.

कळसुबाई  शिखराच्या  पायथ्याशी अडकलेल्या  एक हजार  पर्यटकांची सुटका

ह्या युवकाचे लिव्हर सह्याद्री हॉस्पिटल येथे, किडनी ज्युपिटर हॉस्पिटल पुणे, एक किडनी  अपोलो हॉस्पिटल नाशिक आणि पंक्रिया ज्युपिटर हॉस्पिटल येथे रुग्णांना दिले जाणार आहे.या संदर्भात पुण्याच्या डॉक्टरची टीमने त्याचे अवयव दानाची प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर विशेष अम्ब्युलंसने green corridor  हे हे अवयव पुणे आणि नाशिक येथे पाठविण्यात आले.

Green corridor system in Ahmednagar

what is green corridor ग्रीन कॉर्रीडोर काय असतो ?

या ग्रीन कॉर्रीडोर मध्ये ब्रेन डेड झालेल्या व्यक्तीचे अवयव काढून ते व्यवस्थित ठेऊन खास गाडीने आवश्यक त्या ठिकाणी पाठविले जाते. त्यासाठी विशेष व्यवस्था केली जाते. यामध्ये पोलीस ,वाहतूक पोलीस आणि वैद्यकीय पथकाची मदत घेतली जाते. नगर पासून हे घेऊन जाताना संपूर्ण रस्ता मोकळा करण्यात आला. रस्त्यात कुठेही वाहतूक असणार नाही अशी व्यवस्था करण्यात आली. ज्यायोगे हे अवयव कमी वेळात हॉस्पिटल पर्यंत पोहचतील.green corridor means.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here