बेकायदेशीर तलवारी बाळगणाऱ्या व्यक्तीकडून चार तलवारी जप्त

तलवारी

बेकायदेशीर तलवारी बाळगणाऱ्या व्यक्तीकडून चार तलवारी जप्त

अहमदनगर दि 23 डिसेंबर, प्रतिनिधी

in article

बेकायदेशीर रित्या तलवारी बाळगणाऱ्या व्यक्तीला स्थानिक गुन्हे शाखेने नगरमध्ये पाळत ठेऊन पकडले.त्याच्याकडून 4 तलवारी सह वाहन जप्त करण्यात आले.

हा व्यक्ती जामखेड तालुक्यातील असून तो दिल्ली गेट कडून सिव्हिल हॉस्पिटल कडे तलवारी घेऊन जात होता.
याबाबत अधिक माहिती अशी की,स्थानिक गुन्हे शाखेचे हेड कॉन्स्टेबल संदीप घोडके यांना गुप्त बातमी दाराकडून खात्रीशीर माहीती मिळाली कि, इसम नामे अशोक राळेभात, रा. रत्नापूर, ता- जामखेड हा त्याचे ताब्यातील इट्टीगा कार नं. एमएच-०४-जेबी- ३७५० हीमधून
चार तलवारी घेवून दिल्ली गेट कडून सिव्हील हॉस्पिटल कडे जाणार आहे अशी खात्रीशीर माहीती मिळाल्याने सदरची
माहीती वरिष्टांना कळवून त्यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोहेकॉ/संदीप घोडके,
विश्वास बेरड, भाऊसाहेब कुरुंद, पोना/दिनेश मोरे, शंकर चौधरी, रवि सोनटक्के, दिपक शिंदे, पोकों/सागर ससाणे, रोहीत
येमूल, रणजित जाधव, मयूर गायकवाड, जालिंदर माने, विजय धनेधर, सागर सुलाने अशांनी मिळून दोन पंचासह खाजगी
वाहनाने निलक्रांती चौक या ठिकाणी सापळा रचून छाप्याचे नियोजन करुन थांबले असता दुपारी १६/१५ वा. चे सुमारास मिळालेल्या बातमी मधील फिक्कट राखाडी रंगाची इर्टींगा कार नं. एमएच-०४-जेबी- ३७५० ही दिल्ली गेट कडून निलक्रांती चौकाकडे येताना दिसली. त्याच वेळी पथकातील कर्मचारी यांना रस्त्यावर घेवून सदर गाडीमधील चालकास
इशारा देवून त्याची गाडी थांबवून गाडीस घेराव घातला व गाडी चालकास त्याची गाडी रस्त्याचे बाजूस घेण्यास सांगीतले.
त्यानंतर पथकातील कर्मचारी यांनी सदर गाडीमधील चालकास ताब्यात घेवून त्यांस पोलीस पथकाची व पंचाची ओळख
सांगून त्याचे कारचे झडतीचा उद्देश कळवून त्यास त्याचे नांव, पत्ता विचारले असता त्याने त्याचे नांव, पत्ता अशोक
बाळासाहेब राळेभात, वय- २६ वर्षे, रा. रत्नापूर, ता- जामखेड असे असल्याचे सांगीतले.
त्यानंतर त्याचे कारची पंचासमक्ष झडती घेतली असता त्याचे कारमध्ये ड्रायव्हर सिटचे पाटीमार्गील बाजूस एका
पांढरे रंगाचे गोणीमध्ये ३,८००/-रु. किं. च्या चार धारदार व टोकदार तलवारी मिळून आल्या. सदर तलवारी बाबत
त्याचेकडे विचारपूस केली असता त्याने काही एक समाधानकारक माहिती सांगीतली नाही. सदरच्या तलवारी तसेच
६,५०,०००/-रु. किं. ची इट्टींगा कार नं. एमएच-०४-जेबी- ३७५० असा एकूण ६,५३,८००/- रु. किं. चा मुद्देमाल जप्त
करुन आरोपी विरुध्द तोफखाना पो.स्टे. येथे फिर्यादी पोकॉ/९०२ सागर अशोक ससाणे, नेम- स्थानिक गुन्हे शाखा,
अहमदनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील कार्यवाही तोफखाना पो.स्टे. हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक मनोज पाटील,अपर पोलीस अधीक्षक, सौरभ कूमार आगरवाल,उपविभागीय पोलीस अधिकारी, शहर विभाग, विशाल ढमे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे.

हेही वाचा: श्रीगोंदा-बेलवंडी रेल्वे मार्गावर मालवाहतूक रेल्वेचे १२ डबे घसरले

4 COMMENTS

  1. I realized more something totally new on this fat loss issue. 1 issue is that good nutrition is very vital whenever dieting. An enormous reduction in junk food, sugary food items, fried foods, sugary foods, beef, and whitened flour products could be necessary. Keeping wastes parasitic organisms, and toxic compounds may prevent targets for fat loss. While specific drugs in the short term solve the situation, the awful side effects usually are not worth it, and so they never offer you more than a momentary solution. This is a known undeniable fact that 95% of dietary fads fail. Thank you for sharing your opinions on this website. https://osteoporosismedi.com osteoporosis medications

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here