कार खोल दरीत कोसळुन झालेल्या पती ठार,पत्नी जखमी

Car accident

चारचाकी खोल दरीत कोसळुन झालेल्या पती ठार,पत्नी जखमी

 

in article

कडा ,

Car accident  कारवरील ताबा सुटून कार २०० फूट दरीत कोसळल्याने गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला,तर पत्नी गंभीर जखमी झाली.तालुक्यातील बीडसांगवी गावाजवळील महादेव दरा  घाटात सकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.अंबादास पांडुरंग उगले (वय ४६ वर्षे) असे अपघातातील मृत शिक्षकाचे नाव आहे.

 ते कडा येथे चुलत सास-यांच्या अंत्यविधीसाठी येत होते.   अज्ञात वाहनाने हुलकावणी दिल्याने त्यांचा ताबा सुटल्याने ही घटना घडली.

अंबादास पांडुरंग उगले हे गेवराई तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत होते. सोमवारी पहाटे चुलत सासरे मयत झाल्याने त्यांच्या अंत्यविधीसाठी गेवराई येथून ते कडा (ता.आष्टी) येथे पत्नी सगुणा उगले (वय ४० वर्षे)यांच्यासह फोर्ड कंपनीच्या कारने (क्रमांक एमएच-२३ एडी-०२४९) निघाले होते.

आष्टीत महिला कायदेविषयक साक्षरता शिबीर संपन्न

बीडसांगवी घाटात आले असता त्यांच्या कारला अज्ञात वाहनाने हुलकावणी दिल्याने अंबादास उगले यांचा गाडीवरील ताबा सुटला व कार थेट २०० फूट दरीत गेली.या अपघातात गंभीर जखमी झाल्याने अंबादास उगले यांचा जागीत मृत्यू झाला.तर त्यांची पत्नी सगुणा अंबादास उगले या गंभीर जखमी झाल्या.त्यांच्यावर सुरवातील कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारांसाठी अहमदनगर येथे हलविण्यात आले आहे. हे
अंबादास उगले हे थिटेसांगवी (ता.श्रीगोंदा, जि.अहमदनगर) येथील असून ते गेवराई तालुक्यात कार्यरत होते.

 

Car accident

अपघाताची माहिती समजताच जिल्हा परिषद सदस्य माऊली जरांगे,बीडसांगवीचे सरपंच नंदकिशोर करांडे,संपत ढोबळे,विकास साळवे, दीपक कासवा,गणेश करांडे यांच्यासह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहनातून मृतदेह बाहेर काढण्यासाठी तसेच जखमीला पुढील उपचारांसाठी हलविण्यासाठी मदत केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here