beed shivjayanti सामाजिक एकात्मतेचा नेत्रदिपक शिवजन्मोत्सव सोहळा

beed shivjayanti 
beed shivjayanti 

सामाजिक एकात्मतेचा नेत्रदिपक शिवजन्मोत्सव सोहळा

बाल मावळ्यांनी सादर केलेले देखावे ठरले लक्षवेधी; सर्व समाजघटकांचा उत्फुर्त सहभाग

in article

बीड

beed shivjayanti  भगवा-हिरवा-निळा झेंडा हाती घेतलेले बालमावळे… छत्रपती शिवबांची, माँसाहेब जिजाऊंची लक्षवेधी वेशभुषा…. शिवकालीन सामाजिक एकत्मतेचे दर्शन घडवणारे देखावे… वारकरी सांप्रदायाची पताका डौलाने फ डवणारे बालवारकरी… पारंपारिक पद्धतीच्या पालखीत विराजमान झालेली शिवरायांची मुर्ती… अन् त्या पाठोपाठ चालणारा सामाजिक समरसतेचा जनसागर… असा नेत्रदिपक सोहळा आज बीडकरांनी अनुभवला…. सर्वधर्म समभाव सार्वजनिक शिवजयंती समितीच्या मिरवणूकीने बीडकरांचे लक्ष वेधत सामाजिक एकत्मतेचा संदेश दिला.

तुम्ही-आम्ही बीडकरच्या वतीने प्रतिवर्षी सर्वधर्म समभाव शिवजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यावर्षीही अतिशस सुरेख नियोजनात नेत्रदिपक अशी मिरवणूक रविवारी सकाळी काढण्यात आली. मिरवणूकीच्या प्रारंभी शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यानंतर श्री क्षेत्र नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज, श्री बंकटस्वामी संस्थानचे महंत लक्ष्मण महाराज मेंगडे, बौद्ध धर्मगुुरु, पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकुर, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी अजित पवार, अपर जिल्हाधिकारी उत्तम पाटील, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, डॉ.विक्रम सारुक यांच्यासह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज क्रिडा संकुलातून मिरवणूकीस प्रारंभ करण्यात आला.
ही मिरवणूक सुभाष रोड मार्गे माळीवेस-बलभीम चौक- कारंजा-बशीरगंज मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पोहचली. या दरम्यानच्या मार्गावर ठिकठिकाणी मिरवणूकीचे उत्स्फु र्त स्वागत करण्यात आले. मिरवणूकीत सादर करण्यात आलेले विविध शिवकालीन देखावे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. तसेच लेझीम पथकाबरोबर अनेकांनी ठेका धरला. मिरवणूक
जसजशी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याकडे येत होती तसतसा बालमावळ्यांचा उत्साह वाढत होता. यावेळी विविध पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी लेझीम हाती घेत ठेका धरला. यानंतर छत्रपती शिवरायांनी अभिवादन करत जिजाऊ वंदना घेऊन मिरवणूकीची सांगता करण्यात आली.

शिवकालीन देखाव्यांनी वेधले लक्ष
बीड शहरातील  मिल्लत प्राथमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जिल्हापरिषद शाळा अशोकनगर, आदर्श प्राथमिक विद्यालय, बलभीम महाविद्यालय,  आझाद हिंद उर्दू स्कुल, सर सय्यद अहेमद खान माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा,

तुलसी इंग्लीश स्कुल, जय हिंद सोसायटी,  शिवाजी विद्यालय, डॉ.भीमराव पिंगळे विद्यालयासह बौद्ध महासभेचे समता सैनिक दल मिरवणूकीत सहभागी झाले होते. यावेळी विविध शाळांनी सादर केलेल्या शिवकालीन देखाव्यांनी बीडकरांचे लक्ष वेधले.

ठिकठिकाणी नाष्टा, पाण्याची सोय
सर्वधर्म समभाव शिवजयंती मिरवणूकीस प्रारंभ झाल्यापासून ते समारोप होईपर्यंत विविध चौकांमध्ये सामाजिक संघटनांकडून नाष्टा तसेच पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here