जिल्हा परिषद आष्टा शाळेच्या विज्ञान नाटिकेचा बीड जिल्ह्यात प्रथम क्रमांक

 

 

in article

आष्टी,

Beed news Science drama राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्था नागपूर व माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद बीड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेत जिल्हा परिषद माध्यमिक शाळा आष्टा हरिनारायण शाळेच्या ९वी १०वी च्या मुलींनी बसवलेल्या जय लोभाई देवी या नाटिकेचा बीड जिल्ह्यात प्रथम क्रमांक आल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक मच्छिंद्रनाथ जगताप सर यांनी दिली.

सदर जिल्हास्तरीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धा द्वारकादास मंत्री राजस्थानी विद्यालय बीड येथे सोमवार दिनांक १८ सप्टेंबर २०२३ रोजी संपन्न झाल्या.

Zpschool आष्टा शाळेच्या इंग्रजी विषयाच्या शिक्षिका डॉक्टर अनिता चव्हाण मॅडम,मुख्याध्यापक मच्छिंद्रनाथ जगताप सर, नामदेव भिसे सर, यांनी ही विज्ञान नाटिका बसवून मुलींची तयारी करून घेतली होती.

सदर विज्ञान नाटिकेचे लेखन व दिग्दर्शन डॉ. अनिता चव्हाण मँडम यांनी केले. या नाटिकेत शाळेच्या विद्यार्थिनी कुमारी ज्ञानेश्वरी शेषराव गंडाळ, दिपाली दादासाहेब गळगटे, आदिती अशोक पठाडे, साक्षी हनुमंत गळगटे,वैष्णवी रघुनाथ आंधळे, साक्षी हरिदास कोल्हे,सिद्धी मनोज तगवाले, सोनाली मधुकर गोपाळघरे यांच्या मुख्य भुमिका होत्या तर रेणुका कल्याण पठाडे,अंजली माधव घोडके यांनी वेषभूषा साठी सहकार्य केले.

मानव कल्याणासाठी विज्ञान व तंत्रज्ञान या विषयावर यावर्षीच्या नाट्योत्सवाचे आयोजन केले होते. तसेच श्रेष्ठ आहार, अन्नसुरक्षा, दैनंदिन जीवनात आधुनिक तंत्रज्ञान, आरोग्य सेवेतील सध्याची प्रगती, समाजातील अंधश्रद्धा, अंधविश्वास, या उप विषयाचा समावेश होता. सदर नाटकेस प्रत्येक संघास ३० मिनिटे वेळ दिला होता. आष्टा शाळेतील मुलींनी जय लोभाई देवी या vidnyan natika in marathi विज्ञान नाटिकेच्या माध्यमातून आजही समाजात, जगात चालू असलेल्या अंधश्रद्धेच्या,अंधविश्वास याविषयीचे,उदबोधन, मार्गदर्शन अतिशय सुंदर पद्धतीने सादरीकरण केले. शिक्षणाचे महत्त्व,आरोग्याचे महत्त्व, आडाणी पनामुळे होणारी फसवणूक,वैद्यकीय उपचार घेण्याचे महत्त्व, भोंदूगिरी पासून सावधानता, गर्भलिंग निदान, सामाजिक जाणीव जागृती, आधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाचा स्वीकार कसा करावा इत्यादी विषयी अतिशय सुंदरपणे या नाटिकेतून मुलींनी सादरीकरण केल्यामुळे आष्टा शाळेच्या मुलींच्या नाटकेचा जिल्हा प्रथम क्रमांक आल्यामुळे त्यांची आता विभाग स्तरीय स्पर्धेसाठी जालना येथे निवड झाली आहे.

Ashti news, या उतुंग यशाबद्दल आष्टा शाळेतील मुलींचे व शिक्षकांचे विधान परिषदेचे आमदार सुरेश आण्णा धस,जिल्हा परिषद सदस्य अमर राजे निंबाळकर, शिक्षणाधिकारी माध्यमिक नागनाथ शिंदे साहेब, गटशिक्षणाधिकारी सुधाकर यादव, ज्येष्ठ शिक्षण विस्तारधिकारी मनोरंजन धस,पतसंस्थेचे चेअरमन मारुती पठाडे ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणपत माने, आष्टा गावच्या सरपंच दैवशाला गणेश माळवे, उपसरपंच रूपाली वैभव पठाडे इत्यादींनी शाळेतील मुलींचे व मुख्याध्यापक मच्छिंद्रनाथ जगताप सर,डॉ. अनिता चव्हाण मँडम, रघुनाथ मुटकुळे,नामदेव भिसे,श्रीरंग खोकले, केंद्रप्रमुख धर्मराज शिंदे, राजेंद्र भागवत, मधूकर धुमाळ,, सुभाष बांगर, उमेश झांबरे, लालासाहेब बळे, सोमनाथ वाळके, तुषार पवार, दिगंबर अष्टेकर, बापू शिंदे,द्रौपदी गवळी , सुषमा जाधव ,मनीषा नाईकनवरे , स्वरूपचंद सुराणा , शोभा काळे ,लतीफ शेख  यांचे अभिनंदन केले.आष्टा शाळेचे या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here