मोतीलाल कोठारी विद्यालयाच्या वतीने मतदान जनजागृती विशेष मोहिमेचे आयोजन

Beed loksabha sveep activity मोतीलाल कोठारी विद्यालयाच्या वतीने मतदान जनजागृती विशेष मोहिमेचे आयोजन

कडा

in article

Beed loksabha sveep activity जिल्हा निवडणूक कार्यालय आणि स्वीप समितीच्या वतीने जिल्ह्यातील विविध शाळांना मतदान जनजागृती विशेष मोहीम घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याचं अनुषंगाने कडा येथे मोतीलाल कोठारी विद्यालयाच्या वतीने जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.

देशामध्ये होत असलेला लोकसभा निवडणूक 2024 मध्ये मतदानाचा टक्का वाढावा यासाठी स्वीप अंतर्गत मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असून कडा येथील मोतीलाल कोठारी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गावातून्  मतदान रॅली काढली. तसेच   पथनाट्य सादर करण्यात आले. या उपक्रमात शालेय  विद्यार्थी  सहभागी झाले होते. या मतदान जनजागृती अभियानामध्ये आज विद्यार्थ्यांनी जनजागृती करणारे फलक हाती घेऊन केलेल्या मानवी साखळी करत गावात फेरी काढली. या अभियानात विद्यालयाचे मुख्याध्यापक एम इ शिकारे, उपमुख्याध्यापक प्रकाश सरडे, शिक्षक संजय नाथ, शैलेश खाडे, रंजना जोशी,अनिल पोखरणा, भीमाशंकर मराठे यांच्यासह शिक्षक सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here