पाटोद्याच्या आणखी एका पैलवानाची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

राष्ट्रीय

पाटोद्याच्या आणखी एका पैलवानाची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

बीड दि 6 फेब्रुवारी,प्रतिनिधी

in article

बीड जिल्ह्यात पैलवानाची खाण असल्याचे बोलले जाते.हे मात्र आता तंतोतंत खरे होताना दिसत आहे. पाटोद्याच्या पैलवान

अमोल मुंढेनी पंजाब येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

पुणे येथे झालेल्या राज्य ग्रीको रोमन निवडचाचणी कुस्तीस्पर्धेत पैलवान अमोल मुंढे याने प्रथम क्रमांक मिळवून राष्ट्रीय

स्पर्धेत पदार्पण केले आहे.

मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुल कात्रज येथे झालेल्या राज्य ग्रीको रोमन निवडचाचणी कुस्तीस्पर्धेत बीड जिल्ह्यातील पै

अमोल मुंढे प्रथम क्रमांक मिळवून पंजाब येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

पै अमोल मुंढे हा मूळचा पाटोदा तालुक्यातील पाचंग्री येथील असून त्याची ही निवड 87 वजन गटात झाली आहे.अमोल

याने पाटोदा येथील राहुल आवारे यांचे वडील बाळासाहेब आवारे यांच्या तालमीत 3 वर्षे शिक्षण घेतले.त्यानंतर त्यांनी पुणे

येथे मामासाहेब मोहोळ यांच्या तालमीत शिक्षण घेण्यास सुरुवात केली .पंकज हरपुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या अमोल

कुस्तीचे धडे घेत आहे.त्यांच्या निवडीबद्दल अमोलचे कौतुक होत आहे.

आणखी वाचा:कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी आरोग्याचे नियम पाळणे आवश्यक

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here