आरजीएसटीसी आणि आआयटी, मुंबई येथील शास्त्रज्ञांची महात्मा फुले कृषि विद्यापीठास भेट

 

 

in article

आरजीएसटीसी आणि आआयटी, मुंबई येथील शास्त्रज्ञांची महात्मा फुले कृषि विद्यापीठास भेट

राहुरी विद्यापीठ

Agri drone technology  कृषी  क्षेत्रातील आयओटी, ड्रोन आणि रोबोटीक्स इत्यादींचा वापर पिकांचे निरीक्षण, सर्वेक्षण आणि प्रक्षेत्राचे नमुने तसेच डिजिटल तंत्रज्ञानामुळे शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट future of drones in agriculture करण्यासाठी उपयुक्त ठरेल असे प्रतिपादन कार्यशाळेच्या अध्यक्षीय भाषणात महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी केले.

कुलगुरु डॉ. पाटील यांचे मार्गदर्शनाखाली महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग (RGSTC) आणि इंडियन इंस्टीटयूट व टेक्नोलॉजी, मुंबई येथील शास्त्रज्ञांची भेट आणि जागतिक बँक अर्थसहाय्यीत उच्च शिक्षण प्रकल्प (NAHEP) व भारतीय कृषि संशोधन परिषद, नवी दिल्ली यांचे संयुक्त विद्यमाने राहुरी येथे हवामान अद्ययावत शेती व जल व्यवस्थापनाचे आधुनिक कृषि विज्ञान व तंत्रज्ञान प्रकल्पांतर्गत भविष्यकालीन कृषि तंत्रज्ञानः आयओटी, आर्टिफिशिल इंटेलिजन्स आणि ड्रोनचा वापर या एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. ए.व्ही. सप्रे तसेच सदस्य सचिव डॉ. नरेंद्र शहा, संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार, अधिष्ठाता डॉ. उत्तम चव्हाण, विस्तार शिक्षण संचालक डॉ. तानाजी नरुटे, इंडियन इंस्टिटयूट ऑफ टेक्नोलॉजी, मुंबईचे प्राध्यापक डॉ. जे. आदिनारायणा तसेच विविध विभागातील प्राध्यापक आणि विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख ऑनलाईन व ऑफलाईन माध्यमातून उपस्थित होते.

राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. सप्रे यांनी कृषि क्षेत्र हे पारंपारिक क्षेत्र न राहता एक जटिल प्रक्रिया झाली आहे. तसेच ते म्हणाले की, विविध क्षेत्रातील तज्ञ एकत्रित येवून एकमेकांशी विविध विषयांवर संवाद साधने गरजेचे आहे.

what are the benefits of using drones in agriculture

आरजीएसटीसीचे सदस्य सचिव डॉ. शहा यांनी विविध क्षेत्रातील तज्ञांनी एकत्र येऊन काम केल्यास शेतकर्यांना उपयुक्त अशा नाविण्यपूर्ण तंत्रज्ञानाची निर्मिती करणे अधिक सुलभ होईल तसेच एक ते दोन आठवड्यांचे फॅकल्टी एक्सजेंज प्रोग्रॅम करुन एकमेकांच्या ज्ञानाची देवाण घेवाण करणे गरजेचे असल्याचे सांगितले.
डॉ. गोरंटीवार यांनी आयओटी, सेंसर, ड्रोन, रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स इत्यादी नाविण्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करुन आधुनिक शेती कशी करता येईल याबद्दल मार्गदर्शन केले. डॉ. नरुटे यांनी आधुनिक तंत्रज्ञान आणि विविध नाविण्यपूर्ण डिजिटल तंत्रज्ञानाची जागृती शेतकर्यामध्ये करुन कृषि क्षेत्रामध्ये अचुकता आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी उपयोग होईल. डॉ. चव्हाण म्हणाले की कृषि क्षेत्रातील शिक्षण पध्दतीमध्ये नविन तंत्रज्ञान आणि अभ्यासक्रम समाविष्ठ करणे गरजेचे आहे. आयआयटी, मुंबईचे प्रा. अर्णब मैती यांनी स्मार्ट ड्रोन ईकोसिस्टीम अॅप्लिकेशन आणि महाराष्ट्रातील ड्रोन विकासाची धोरणे,  आव्हाने आणि संधी या विषयी शास्त्रज्ञांना मार्गदर्शन केले.agriculture drones in  याप्रसंगी शास्त्रज्ञांनी विद्यापीठाच्या कास्ट प्रकल्पाच्या प्रात्यक्षिक प्रक्षेत्रात ड्रोन प्रयोगशाळा, आयओटी प्रयोगशाळा, रोबोटीक्स तंत्रज्ञान, आयओटी पार्क, सेंद्रिय शेती संशोधन प्रकल्पास भेटी दिल्या. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन डॉ. मुकुंद शिंदे आणि आभार डॉ. पवन कुलवाल यांनी केले.

use of drones in agriculture ppt या कार्यशाळेचे कार्यक्रम समन्वयक म्हणुन डॉ. शुभांगी घाडगे, डॉ. वैभव मालुंजकर, इंजि. मोहसीन तांबोळी आणि इंजि. शुभम सुपेकर होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here