Homeताज्या बातम्याकार आणि दुचाकीच्या धडकेत 3 मजूर ठार

कार आणि दुचाकीच्या धडकेत 3 मजूर ठार

कार आणि दुचाकीच्या धडकेत 3 मजूर ठार

तेलगाव

<span;>मजूर कामावरुन सुट्टी झाल्याने घरी परत जात होते. यावेळी कार व दुचाकीची धडक होऊन घडलेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना माजलगाव-तेलगाव रस्त्यावरील शिंदेवाडी जवळ बुधवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.

लहामेवाडी ( ता. माजलगाव ) येथील तीन तरुण एका जिनिंग मध्ये कामासाठी येतात. बुधवारी ( दि. १ ) सायंकाळी कामावरुन सुट्टी झाल्याने ते परत गावाकडे चालले होते. यावेळी भरधाव स्विफ्ट कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये तिघांना जबर मार लागल्याने दोघे जागीच ठार झाले तर एकास दवाखान्यात डॉक्टरांनी मृत्यू झाल्याचे घोषित केले. नितीन भाऊसाहेब हुलगे, आण्णासाहेब बळीराम खटके, लक्ष्मण सुभाष कापसे तिघे रा. लहामेवाडी ( ता. माजलगाव ) अशी मयतांची नावे आहेत. एकाच गावातील तरूणांचे अपघाती निधन झाल्याने गाव सुन्न झाले असून, तीन कुटुंबांचे आधार हरवल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments