सार्वजनिक बांधकाम विभागातील लिपिक लाच घेताना रंगेहात पकडला

१४७५००

 

आष्टी । प्रतिनिधी
सार्वजनिक बांधकाम विभागातून नुतनीकरणाच्या कामाचे बील काढण्यासाठी सहा हजार रूपयांची मागणी केल्या प्रकरणी लिपीक अंबादास फुले याला बीड येथील लाचलुचपत अधिका-यांनी रंगेहाथ पकडले.

in article

याबाबत अधिक माहिती अशी की,आष्टी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत रस्ताचे खडीकरण व नळकांडी टाकलेले बील काढण्यासाठी या विभागाचा लिपीक अंबादास फुले याने आष्टी येथील सलिम हसन कुरेशी यांच्याकडे सहा हजार रूपायाची मागणी केली होती.

कुठे आणि कसा पाहणार दहावीचा निकाल

आपल्याकडून कामाचे बिल देण्यासाठी सहा हजार रूपये मागणी केली असल्याची तक्रार लाचलुचपत विभागाकडे केली होती.त्या दरम्यान आज गुरूवार दि.15 रोजी लाचलुचपतच्या अधिका-यांनी बी अँड सी च्या कार्यालयात सापळा लावून सांयकाळी 6  च्या दरम्यान लिपीक फुले याला रंगेहाथ पकडले.या पथकात पोलिस उपाअधिक्षक बाळकष्ण हनपुडे पाटील यांच्यासह पोलिस निरीक्षक रविंद्र परदेशी यांच्या पथकाने कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here