मनसे प्रमुख राज ठाकरे-मविआ सरकार पडण्याची शक्यता वाटत नाही

मनसे प्रमुख राज ठाकरे

\

 

in article

 

 

औरंगाबाद

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथे भेट दिली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले.

राज्यातील मविआ सरकार लवकरच पडेल असे दावे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून केले जातात. त्यासाठी वारंवार तारखा दिल्या जातात. याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरें फोटो प्रश्न विचारण्यात आला.

सत्तेत असलेल्या तीन पक्षांकडे पाहता महाविकास आघाडी सरकार पडेल असं वाटत नाही, असं राज ठाकरे म्हणाले.

ते औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

मूळ प्रश्नाकडे कुणाला वळायचेच नाही, निवडणुकीवेळी सर्व प्रश्नांचा विसर पडतो. जनताही मतपेटीतून राग व्यक्त करत नाही, असेही ते यावेळी म्हणाले. याला जबाबदार राजकारणी व माध्यम आहेत अशीही टिका त्यांनी केली. जनतेने अधिक सुज्ञ होण्याची गरज आहे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

sai baba udi prasad online लाडू विक्री काऊंटर सुरु

सध्या ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रकरण सुरु आहे, राज्य सरकारने अथवा केंद्र सरकारने ओबीसी जणगणना करावी यांवर टोलवाटोलवी सुरु आहे. राज्यभरातील महानगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यासाठीच ओबीसी आरक्षणाचा गोंधळ सुरु आहे, असा थेट आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे माहिती यांनी यावेळी केला.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांची पत्रकार परिषद

यामुळे राज्यातील येणाऱ्या महापालिका निवडणुका सहा – आठ महिने पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केली. भविष्यात कोणत्या पक्षासोबत युती किवा आघाडी करणार का ?

या प्रश्नावर आमची रणनिती काय असेल ते आता सांगता येणार नाही असे उत्तर राज ठाकरे यांनी दिले. एमआयएम या पक्षाने नुकताच मुस्लिम आरक्षणासाठी मुंबईत तिरंगा मोर्चा काढला होता तसेच एमआयएम खा. इम्तियाज जलील यांनी जर सरकारने मुस्लिम वर्गाला आरक्षण दिले तर येणाऱ्या महापालिका निवडणुका एमआयएम पक्ष लढणार नाही यांवर आपली प्रतिक्रिया काय ? यांवर त्यांनी निवडणुका न लढलेल बर ही प्रतिक्रिया कृष्णकुंज राज  ठाकरे यांनी दिली.

 

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here