कायदेविषयक शिबिरे;सर्वसामान्य नागरिकांना माहिती होण्यासाठी

कायदेविषयक शिबिरे

न्यायाधीश के. के.माने यांचे प्रतिपादन

आष्टी-प्रतिनिधी

in article

कायदेविषयक शिबिरे हे  केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने अनेक योजनांची अंमलबजावणी करण्यात येते मात्र तळागाळातील सर्वसामान्य जनतेपर्यंत या योजनांचा लाभ मिळतो आहे किंवा नाही हे पाहण्याची आवश्यकता आहे.

याबाबत अनेक कायदे आहेत या कायद्याबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने कायदेविषयक शिबिरांचे आयोजन करण्यात येत असल्याचे प्रतिपादन आशियातील प्रथम वर्ग दिवाणी न्यायाधीश के. के. माने यांनी केले

यावेळी सह दिवाणी न्यायाधीश एन व्ही शिंपी यांनी लोकअदालतद्वारा जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढून पैसा आणि वेळ यात याचा अपव्यय टाळावा असे आवाहन केले.

आष्टी येथील तहसील कार्यालय येथे आयोजित केलेल्या कायदेविषयक शिबिर मध्ये मार्गदर्शन करताना ते दोघे बोलत होते.

पुढे बोलताना न्यायाधीश माने म्हणाले की, केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या योजनांची माहिती नसल्यामुळे जनतेपर्यंत त्याचा लाभ मिळत नाही.

शेतकरी सामान्य नागरिक, जेष्ठ नागरिक, महिला बालके, मानसिक दृष्ट्या विकलांग यांच्यासाठी शासनस्तरावरील आर्थिक मदतीच्या अनेक योजना आहेत. त्यासाठी कायद्याच्या तरतुदी आहेत.

यासंबंधीची माहिती  कायदेविषयक शिबिरे यातून  देण्यात येते जमिनीचा वाद बँक प्रकरणे यासंबंधीची प्रकरणे लोक अदालतीमध्ये मिटवल्यामुळे पैसा आणि वेळेचा अपव्यय होत नाही.

बँकांकडून व्याजावर सूट देण्यात येत असल्यामुळे लोक आता रिती मध्ये जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने मिटवण्यात यावीत असे आवाहन एन. के.शिंपी यांनी यावेळी केले.

कायदेविषयक शिबिरे

यावेळी व्यासपीठावर नायब तहसीलदार प्रदीप पांडुळे, नायब तहसीलदार नीलिमा थेऊरकर,नायब तहसीलदार शारदा दळवी,नायब तहसीलदार पंढरपूरे, वकील संघाचे अध्यक्ष महादेव तांदळे, सचिव अजय जोशी हे उपस्थित होते.

आणखी वाचा:Ahmdnagar corona ७४७ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ८४८ बाधितांची रुग्ण संख्येत भर

सर्व मान्यवरांचे पुष्पहार ऐवजी पुस्तके देऊन स्वागत करण्यात आले. या कायदेविषयक शिबिरामध्ये प्रास्ताविकामध्ये ॲड.अजय जोशी यांनी भारताच्या स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षांमध्ये नागरिकांना कायद्याची तोंड ओळख होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिबिरांचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगितले.

यावेळी मार्गदर्शन करताना ॲड. बाळासाहेब झांबरे यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण भाषण करून शेतकरी महिला रेस खादी ग्रामोद्योग इत्यादींसाठी योजनांची माहिती दिली.त्यांच्या या भाषणाचे कौतुक झाले.

यावेळी ॲड. महादेव मोहिते यांनी राष्ट्रीय आपत्ती निवारणार्थ उपाययोजना आणि यासंबंधित शासनाच्या वतीने देण्यात येणार्‍या नुकसानभरपाई संबंधीची सविस्तर माहिती दिली.

कायदेविषयक शिबिरे

तर ॲड. बाबुराव गर्जे यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या समस्यांवर २००७ साली प्रभावी कायदा करण्यात आला असून शासनाने वृद्धाश्रमातद्वारे ज्येष्ठ नागरिकांना सुविधा निर्माण केली असल्याचे सांगितले.

कायदेविषयक शिबिरे याच आभार प्रदर्शन नायब तहसीलदार प्रदीप पांडुळे यांनी केले तर सूत्रसंचालन ॲड. संग्राम गळगटे यांनी केले, यावेळी वकील संघाचे सर्व सदस्य, तहसिल कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here