राजूर

कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य राजूर वनक्षेत्रात रानडुक्कर शिकार करत असताना एक आरोपीस अटक केली असून चार जन फरार आहेत .  वनपाल कोथळे यांस
मिळालेल्या गुप्त बातमीतून सोमलवाडी शिवारामध्ये जंगली डूक्करा ची बंदुकीने शिकार झाल्याची
खबर मिळाली, त्यांनी तात्काळ वनकर्मचार्याना  सोबत घेऊन घटना स्थळी धाव घेऊन परिस्थितीची शहानिशा करून वरिष्ठांना सर्व परिस्थितीची कल्पना दिली, परिस्थितीचे गांभीर्य ओळखून श्री. गणेशरणदिवे सहा.वनसंरक्षक कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य, श्री.दत्तात्रय पडवळे वनक्षेत्रपाल वन्यजीव राजूर यांनी घटनास्थानी धाव घेऊन चौकशी ची चक्रे वेगाने फिरवून मौजे गंभीरवाडी (सोमलवाडी)येथील एका संशयित आरोपी च्या घरातून अल्यूमिनियम च्या पातील्यात ठेवलेले जंगली इक्करचे मांस जप्त करून त्यास तात्काळ चौकशी साठी ताब्यात घेतले, व ४ मे रोजी छापा टाकून   आरोपीस अटक करून
न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग अकोले यांच्यासमोर हजर केले असता त्यास तीन दिवसाची वन कोठडी मिळाली, चौकशी मध्ये आरोपी च्या घराची झड़ती घेतली असता, त्यात ५ डूक्कर मारण्याचे जाळे ५ वाघुर, २ कोयते वाघुर ला लावण्याच्या काठ्या ,१ दारूची बॉटल१ बॉटरी, मटन तोड़ण्याचा
लाकडी ठोकळा, असा मुद्देमाल हस्तगत केला, सदर घटनेत सामील असलेले रायगड़ जिल्हा,व ठाणे
जिल्हा येथील ४ आरोपी ची संपूर्ण माहिती तपास अधिकारी यांच्या हाती लागली असून हे।
अंतरजिल्हा रॅकेट असल्याचे उघड़ इाले आहे,त्याच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ भारतीय वन अधिनियम १९२७ अन्वये गुन्हा नोंद करून इतर गुन्हेगाराचा शोध सुरु आहे,
आरोपीना या गुन्हयात ३ ते ७ वर्षाचा कारावास व २५ हजार रु.पर्यत दंड होण्याची शक्यता आहे,
संशयितांना बोलावून चौकशी करण्याची कार्यवाही चालू आहे, जप्त केलेले मटन हे प्रयोगशाळेत
तपासणी साठी पाठवण्यात आले आहे. सदर ची कार्यवाही मा.श्री.सुनील लिमये (अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक
वन्यजीव),मा.श्री.अनिल अंजनकर (वनसंरक्षक वन्यजीव नाशिक) यांच्या मार्गदर्शनाखाली तपास
अधिकारी मा.श्री.गणेश रणदिवे (ACF),मा.श्री. दत्तात्रय पडवळे (RFO),मा. श्री. अमोल आडे (RFO),
श्री.शंकर लांडे (वनपाल),श्री.राजेन्द्र चव्हाण (वनपाल), श्री.सचिन धिंदळे (वनपाल), श्री.भास्कर मुठे
(वनपाल),श्री.रविंद्र सोनार (वनपाल), श्री. विनोद कोळी (वनरक्षक), श्रीमती ज्योत्स्ना
बेद्रे(वनरक्षक),श्री, निलेश पिचड (वनरक्षक), श्री.गंगाराम पालवी (वनरक्षक), श्री.हनुमंत इदे
(वनरक्षक),श्री.अविनाश भोये(वनरक्षक) श्री.रवींद्र मौळे (वनरक्षक) श्री.दत्तू डंबाळे(वनरक्षक), श्री.गोविंदा
आढळ (वनरक्षक),श्री.दत्तात्रय भोये (वनरक्षक). श्री. चंद्रकांत तळपाडे (वनरक्षक), श्री. संजय गीते
(वनरक्षक), श्री.गुलाब दिवे (वनरक्षक) वाहनचालक बो्हाडे यांनी या कार्यवाहीत सहभाग घेतला.
इतर वन्यजीवांच्या शिकारीचीही माहिती व बड़े मासे गळाला लागण्याची शक्यता असल्याचे सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांनी सांगितले .

Anil deshmukh,अखेर इडी ने केली अनिल देशमुख यांना अटक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here