अहमदनगर बीड परळी रेल्वे चा मुहूर्त ठरला!

अहमदनगर बीड परळी रेल्वे

 

 

in article

अहमदनगर बीड परळी रेल्वे  मार्गावरील सोलापूर वाडी ते आष्टी या दरम्यान होणाऱ्या  हाय स्पीड रेल्वेची ट्रायल लवकरच होत आहे. त्याची प्रतीक्षा संपली असून  beed railway latest news पुढे ढकलण्यात आलेली ट्रायल येत्या महिना अखेर ला होत आहे.

अहमदनगर बीड परळी रेल्वे

अहमदनगर बीड परळी या रेल्वेमार्गावरील आष्टी पर्यंतची कामे आता पूर्ण झाली आहेत. त्यामुळे या 61 किमी अंतरावर रेल्वेची टेस्टिंग केली जाणार आहे. यासाठी तारीखही निश्चित करण्यात आली आहे  ती म्हणजे 28  डिसेंबर.

अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्गाचे काम गेल्या अनेक वर्षापासून रखडले होते.  nagar beed parli railway line status अशा परिस्थितीत गेल्या दोन वर्षापासून या रेल्वे मार्गावर  कामाने वेग घेतला.यामुळे आष्टी पर्यंतची रेल्वे ची कामे पूर्ण झाली आहे. एकूण  61 किलोमीटर अंतराचा असलेला हा टप्पा पूर्ण केला आहे. यासाठी रेल्वे च्या अधिकाऱ्यांनी  दिवस-रात्र एकत्र करत ही कामे पूर्ण केली आहेत. गेल्या आठ दिवसापासून सोलापूरवाडी ते आष्टी या दरम्यान हाई स्पीड रेल्वे ची ट्रायल केली जाणार असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

एखाद्या रेल्वेमार्गाचे काम पूर्ण होत असताना वेळोवेळी या रेल्वे मार्गाचे टेस्टिंग आणि तपासणी करणे आवश्यक असते. या अनुषंगाने दररोज हाय स्पीड रेल्वेची टेस्टिंग केली जात आहे.

 

 

 

अहमदनगर बीड परळी रेल्वे  टेस्टिंग आणि ट्रायल

 

आष्टी पर्यंत ची काम पूर्ण झाली आहेत. गेल्या काही वर्षापूर्वी तयार केलेले रेल्वे रुळावरून रेल्वे धावली नसल्याने त्याची तपसणी करणे गरजेचे असते. त्यासाठी टेस्टिंग केली जाते. तर संपूर्ण रेल्वे रूळ तयार झाल्यानतर त्यावर पूर्ण क्षमतेने चालणे याला ट्रायल म्हटले जाते. ही ट्रायल 28 डिसेंबर ला मुंबई येथील रेल्वे निर्मिती विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होत आहे.

 

अहमदनगर बीड परळी रेल्वे parali nagar railway line  मार्गावर फक्त आष्टी पर्यंत काम पूर्ण झाली आहेत. तेथून पुढे अनेक ठिकाणची कामे बाकी आहे. अहमदनगर ते बीड beed railway station पर्यंत ची कामे होण्यास अजून काही वर्षे जावे लागणार आहेत. पाटोदा तालुक्यातील अनेक भागातून जात असलेल्या या रेल्वे मार्गाचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे हि रेल्वे बीड पर्यंत जाण्यासाठी काही काळ लागणार आहे.

आणखी वाचा :नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग च्या जागा अनारक्षित करून १८ जानेवारीला मतदान

२०१७ मध्ये नगरहून नारायणडोहो पर्यंत 15 किमी ची  ट्रायल घेण्यात आली होती.तेथून पुढे सोलापूरवाडी पर्यंत म्हणजेच 35 किमी अंतरावर गेल्या दोन वर्षापूर्वी ट्रायल घेण्यात आली. त्यानंतर हा टप्पा पुढे गेल्याने थेट आष्टीपर्यंत 61 किमी अंतर रेल्वे रुळाने गाठले आहे.

 

दक्षिण रेल्वेचा सर्वात मोठा पूल अहमदनगर बीड परळी रेल्वे मेह्करी पूल

अहमदनगर बीड परळी रेल्वे 2

सध्या हा सिंगल रूळ तयार करण्यात आला आहे. तर स्टेशनच्या ठिकाणी पार्किंग रूळ आणि प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे.याच मार्गावर दक्षिण रेल्वे विभागातील सर्वात मोठा पूल तयार करण्यात आला आहे.

अहमदनगर-बीड-परळी ब्रॉड गेज नवीन लाईन एक महत्वाची जीवनरेखा आहे.जी अहमदनगर व बीड जिल्ह्यात संपर्क साधेल. हा पूल मेहकारी नदीवरुन जातो आणि म्हणून त्याला मेहकरी ब्रिज म्हणतात.  हे अहमदनगरपासून अंदाजे 40 किलोमीटर अंतरावर आहे.  हा उपक्रम बीड जिल्ह्याला रेल्वे जोडणी पुरवण्याच्या दृष्टीकोनातून आहे.  हा 15 स्पॅनचा  पूल असून प्रत्येक कालावधीची लांबी 30.5 मीटर आहे.  500 टन आणि 400 टन उचलण्याची क्षमता असणार्‍या 2 क्रेन वापरण्यात आल्या.  या पुलाचे वैशिष्ट्य या पुलाची उंची 33 मीटर इतकी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here