कोरोनाने ऑलिम्पिक पदक हुकविले;अविनाश साबळे याची खंत

अविनाश साबळे

 

 

in article

कडा- प्रतिनिधी

दोन वेळा कोरोना ने जाम केले. त्यामुळे ऐन स्पर्धेच्या वेळी  कामगिरी कमी पडली. पाय पळत नव्हते, पायाला त्रास होत होता,पण जिंकायच्या अपेक्षेने धावत होतो, कोरोनाने मागे खेचले असे ऑलिम्पिक खेळाडू अविनाश साबळे याने सांगितले.

टोकियो ऑलिम्पिक २०२१ मध्ये स्टीपल चेस या क्रीडा प्रकारात सहभागी झालेला  अविनाश साबळे  नुकताच आपल्या  मांडवा या गावी परतला आहे. त्याचा आनंदराव धोंडे महाविद्यालयात ,माजी आमदार भीमसिंह धोंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी धोंडे यांच्या वतीने २५००० रुपयांची मदत अविनाश यास देण्यात आली.

सन १९५२ नंतर या क्रीडा प्रकारात सहभागी होणारा तो भारतातील पहिला खेळाडू आहे. त्याने जपान टोकियो येथे जबरदस्त कामगिरी केली. मात्र पदकापर्यंत तो पोहचू शकला नाही. त्याची खंत त्याला आहे. याबाबत त्याने सांगितले कि, मला त्यापूर्वी दोन वेळा कोविड ने ग्रासले. परंतु हिम्मत न हरता मी सराव करत होतो. परंतु ऑलिम्पिक खेळ सोपा नाही. असे सांगून आपण भविष्यात भारतासाठी पदक मिळविणारच असे सांगितले.

अविनाश साबळे : मी जिंकणारच…..

ग्रामीण भागातील खेळाडू हे नेहमीच पुढे जातात. मी पण ग्रामीण भागातून पुढे गेलो आहे. कोविड मुळे मी पदक मिळवू शकलो नाही याची खंत आहे .असे ऑलिम्पिक स्पर्धेतील सहभागी खेळाडू अविनाश साबळे याने सांगितले.

आनंदराव धोंडे उर्फ बाबाजी महाविद्यालयाच्या वतीने टोकियो ऑलिम्पिक मध्ये स्टीपल चेस या क्रीडा प्रकारात सहभागी झालेला खेळाडू अविनाश साबळे याचा सत्कार करण्यात आला त्यावेळी त्याने सांगितले.

आणखी वाचा: काबुल स्फोटात ७० हून अधिक मृत्युमुखी 

यावेळी बोलताना अविनाश याने आगामी काळात आपण देशासाठी निश्चित ऑलिम्पिक पदक जिंकणार अशी आशा व्यक्त केली. यावेळी त्याने आपल्याला प्रेरणा देणाऱ्या शिक्षकांचा उल्लेख करत गौरव केला. भविष्यात आपल्या तालुक्यात क्रीडा अकेडमी उघडण्याचा आपला मानस असल्याचे अविनाश ने सांगितले.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here