नाशिक जवळील भगुर येथे सावरकरांच्या जीवनावर थीम पार्क आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय उभारणार

vinayak damodar savarkar nashik bhagur
vinayak damodar savarkar nashik bhagur

 

हजारो सावरकर भक्तांच्या उपस्थितीत अभिवादन यात्रा

in article

नाशिक

vinayak damodar savarkar nashik bhagur भारतीय स्वातंत्र्य चळवळीत मोलाचे योगदान देणाऱ्या
क्रांतीकारकांचे मुकूटमणी आणि द्रष्टे समाज सुधारक स्वातंत्र्यवीर
विनायक दामोदर सावरक यांच्या भगुर या जन्मगावी आंतरराष्ट्रीय दर्जाचे थीम
पार्क आणि संग्रहालय शासनाच्या माध्यमातून उभारण्यात येईल, अशी घोषणा
राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज नाशिकमध्ये केली.

मारिता मारिता मरेतो झुंजेन म्हणत जुलमी सरकार विरुद्ध संपूर्ण जीवन भारतीय स्वातंत्र्य संग्रामामध्ये झोकुन देणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील भगूरचे भूमिपुत्र स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या आत्मरपण( पुण्यतिथी) दिनानिमित्त नाशिक जिल्ह्यातील भगूर येथील सावरकर स्मारकांमध्ये राज्याचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आदरांजली अर्पण केली.

मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते स्मारकातील सावरकरांच्या पुतळ्याला पुष्पचक्र अर्पण करण्यात आल पुष्पहार घालण्यात आला. नाशिक येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवाराची निगडित असलेल्या भोसला मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सावरकरांना मानवंदना दिली. सावरकरांच्या आत्मसमर्पण दिनानिमित्त भगूर मधून सावरकरांच्या पूजेतील अष्टभुजा देवीच्या पालखीसह अभिवादन रॅली काढण्यात आली होती.

या अभिवादन रॅलीमध्ये शालेय विद्यार्थ्यांसह भोसला मिलिटरी कॉलेज आणि स्कूलचे विद्यार्थी विद्यार्थिनी लष्करी गणवेशात संचालन करत सहभागी झाले होते. सावरकर स्मारकाच्या परिसरात झालेल्या कार्यक्रमात बोलताना पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की, सावरकरांच्या वास्तव्यामुळे भगूर सर्वांसाठी तीर्थस्थळ झाले आहे. भगूर पर्यटन स्थळ घोषित करण्याबरोबरच भगूर मधील सावरकर थीम पार्क वस्तू संग्रहालयाचे काम 2024 च्या सावरकर जयंती पर्यंत पूर्ण करण्यात येईल.

read more

त्याचबरोबर भगूर येथील सावरकरांची शाळा सावरकरांच्या देवीचे मंदिर याचे संवर्धन करण्यात येईल. नवीन सरकार सावरकरांच्या विचाराचअसून त्यांच्या आदर्शावर काम करून काम वेळेत पूर्ण करू असे लोढा म्हणाले. सावरकरांचे वास्तव्य लाभलेले भगूर येथील जन्मस्थान, नाशिक मधील अभिनव भारत मंदिर, पुण्यातील फग्युर्सन कॉलेज, सांगलीतील
बाबराव सावरकर यांचे स्मारक, रत्नागिरी येथील पतीत पावन मंदिर यांची एक शृंखला म्हणजे सर्कीट तयार करण्यात येईल,असेही लोढा म्हणाले.थीम पार्क वस्तुसंग्रहालय आदी कामांसाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

सावरकर स्मारकांमध्ये सावरकरांच्या देवीची देखभाल करणारे खैरे कुटुंबीयांचा या वेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात बागेश्री वाद्य वृंदाच्या कलाकारांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रसिद्ध गीत सादर केली या कलाकारांचाही सत्कार करण्यात आला .तसेच भगूरचे निवासस्थान स्मारक म्हणून घोषित व्हावे यासाठी अथक प्रयत्न करणारे विश्व हिंदू परिषदेचे जेष्ठ नेते एकनाथराव शेटे यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.

यावेळी विवेक व्यासपीठाच्या अश्वीनी मयेकर, खासदार हेमंत गोडसे,आमदार राहुल ढिकले, संजय केकाण, मृत्यूंजय कापसे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here