technovation pune टेक्नोव्हेशन 2023 विज्ञान तंत्रज्ञान प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद

technovation pune
technovation pune

 

पुणे

in article

technovation pune  शासकीय अनुदानित शाळांच्या विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक प्रयोगांच्या ‘टेक्नोव्हेशन २०२३’ या विशेष विज्ञान तंत्रज्ञान प्रदर्शनाला शनीवारी चांगला प्रतिसाद मिळाला.विज्ञान आश्रम आणि एल.टी.आय.माईंडट्री यांच्यावतीने आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनाचे उदघाटन १८ फेब्रुवारी रोजी सकाळी साडे दहा वाजता एल.टी.आय.माईंडट्री (वाकडेवाडी,शिवाजीनगर) येथे झाले.

या प्रदर्शनाचे हे चौथे वर्ष होते. ३६ शाळांचे इयत्ता आठवी ते दहावी चे विद्यार्थी सहभागी झाले.

सेंटर फॉर टेक्नॉलॉजी अल्टरनेटीव्हज फॉर रुरल एरियाज,आयआयटी मुंबईचे डॉ.आनंद राव, अटल इनोव्हेशन मिशन ( नीती आयोग ) चे प्रतीक देशमुख, जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी बी.आर. शिंपले, स्वरूपा गुरव, मकरंद श्रीखंडे, विज्ञानाश्रम चे संचालक डॉ. योगेश कुलकर्णी, सुनील अगरवाल , महेंद्र भोर , सचिन पुणेकर यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले.

समाज आणि भोवतालच्या समस्या समजावून घेऊन त्यावर विज्ञान तंत्रज्ञानाची उत्तरे शोधणारे प्रकल्प या प्रदर्शनात मांडण्यात अाल्याची माहिती विज्ञान आश्रम चे संचालक डॉ. योगेश कुलकर्णी यांनी दिली.

‘इमॅजिन, इन्व्हेन्ट अँड इन्स्पायर’ हे या प्रदर्शनाचे उद्दिष्ट होते. स्मार्ट बुजगावणे, कंपोस्ट सिव्ह मशीन, लो कॉस्ट ट्रेड मिल, थ्री डी प्रिंटेड विंडो ग्लास क्लिनर, फरशी पुसण्यासाठी स्मार्ट मॉप, सुपारी सोलण्याचे यंत्र, मँगो पल्प स्टरर, धार करणारे यंत्र, बहुपयोगी टेबल, फर्टिलायझर इक्विपमेंट असे अभिनव प्रयोग हे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य होते. प्रदर्शनातच प्रयोगांचे परीक्षण करून पारितोषिक वितरण करण्यात आले. चेतन यांनी सूत्रसंचालन केले.

technovation pune विजेत्यांना पारितोषिक वितरण

आदर्श विद्यालय ,आंबोली(प्रथम क्रमांक), आनंदराव पाटील प्रशाला, बेलेवाडी(द्वीतिय क्रमांक),राजापूर हायस्कूल( तृतीय क्रमांक),हिरकणी विद्यालय गावडेवाडी( उत्तेजनार्थ) या विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. प्रथम क्रमांक प्राप्त आदर्श विद्यालयने स्मार्ट बुजगावणे हा प्रकल्प सादर केला होता.

डॉ. आनंद राव म्हणाले, ‘ आजची पिढी स्मार्ट असल्याने वैज्ञानिक प्रकल्प देखील स्मार्ट आहेत. डोक्याने काम करता करता,हाताने काम करणे दुर्मीळ होऊ नये.ती धोक्याची घंटा ठरू शकते. पुढील काळात हाताने काम करणाऱ्यांना चांगली संधी मिळणार आहे.तंत्रज्ञानाचा फायदा ग्रामीण भागाला झाला पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here