या शेतीतून युवक करतोय लाखोंची कमाई ..!

organic turmeric powder
organic turmeric powder

 

अहमदनगर

in article

organic turmeric powder अहमदनगर जिल्ह्यातील घोसपुरी येथील प्रवीण झरेकर यांनी आजीने सुरू केलेल्या हळदीच्या शेतीचा वारसा पुढे सुरू ठेवत सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे.

आजीच्याच नावाने म्हणजे सुभद्रा ब्रॅंडने हळद पावडरची pure organic turmeric powder  निर्मिती करून अल्पावधीत सुमारे चार हजाराहून अधिक ग्राहकांची बाजारपेठही त्यांनी मिळवली आहे. प्रविणने शेलम वाणाच्या हळदीची 4 एकरात लागवड केली आहे.

ही शेती करण्यासाठी प्रविणला एकरी 50 हजार रुपयांचा खर्च आला. हळद पावडर बनवण्यासाठी एकरी 50 हजार रुपये खर्च येतो. खर्च वजा जाता प्रविणला एकरी अडीच ते 3 लाखांचा नफा मिळतो.

जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर प्रवीण झरेकर हा युवक हळदीच्या उद्योगात यशस्वी झाला आहे. तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योग व्यवसायाकडे वळावे असे आवाहन प्रवीण झरेकर यांनी केले आहे.

अहमदनगर दक्षिण जिल्ह्यातील बहुतांश भाग दुष्काळी आहे. या भागांमध्ये पारंपरिक आणि फळपिके घेण्यावर शेतकऱ्यांचा भर असतो. प्रवीण झरेकर कृषी पदवीधर असून, त्यांनी पूर्णवेळ शेतीलाच प्राधान्य दिले आहे. कायम दुष्काळी संघर्ष असलेल्या या भागात प्रवीण यांनी हळदीचे पीक रुजवले आहे.

प्रवीणने राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात येथे फळप्रक्रियेचे तीन महिन्यांचे प्रशिक्षण घेतले आहे. प्रवीण यांचे आजी-आजोबा (सुभद्राबाई आणि बाबासाहेब) हे दहा वर्षांपूर्वी पर्यटनाला गेले असता हळदीचे गावरान बेणे घेऊन आले. तेव्हापासून अर्ध्या ते एक गुंठ्यात घराशेजारी त्याचे उत्पादन घेत असत.

केवळ शेणखतावरच organic turmeric  हे पीक चांगले यायचे. प्रवीण यांनी ही बाब हेरली. आजीची प्रेरणा घेत हळदीची व्यावसायिक शेती करण्याचा निर्णय घेतला.

घरच्या हळदीपासूनच बेणे तयार करून तीन वर्षांपूर्वी अर्ध्या एकरात लागवड केली. हळदीची पावडर तयार करून अधिक उत्पन्न मिळविण्याच्या उद्देशाने दळणयंत्र आणि पॅकिंग यंत्र खरेदी केले. ‘सोशल मीडिया’ची मदत घेत ग्राहक तयार केले.

जवळपास सर्व हळद विकली गेली. सध्या चार एकर हळदीचे पीक त्यांनी घेतले आहे. त्यातून एकरी 20 ते 23 क्विंटल उत्पादन निघते. प्रति किलो हळकुंडापासून सुमारे 900 ग्रॅम तर एकूण 20 क्विंटलपर्यंत पावडर होते. याकामात संपूर्ण शेतीत सर्व कुटुंबीयांची मोठी मदत मिळते.

हळद विक्रीचे प्रयत्न करताना प्रवीण यांनी स्वतः ग्राहक शोध सुरू केला. सेंद्रिय पावडर organic haldi  तसेच दर्जा आणि विश्‍वासार्हतेने ग्राहकांत भर पडत गेली. एकमेकांच्या मदतीने आणि मौखिक प्रसिद्धीतून मागणी वाढू लागली. बचत गटांची प्रदर्शने तसेच कृषी प्रदर्शनांमधून आणि हॉटेलमधून हळद पावडरची pure turmeric powder मोठ्या प्रमाणात विक्री होते.

आतापर्यंत सुमारे चार हजारांपेक्षा जास्त ग्राहक जोडल्याचे प्रवीण सांगतात. सध्या 200 ते 250 रुपये प्रति किलो दराने मुंबई, पुणे, अहमदनगरसह ईतर भागात सेंद्रिय हळद पावडरची pure turmeric  विक्री होत आहे. कुरिअर वा अन्य सुविधेतूनही पुरवठा करण्यात येतो. घोसपुरी परिसरातील बहुसंख्य ग्राहकही थेट घरून खरेदी करतात. हळदीच्या शेतीत आजीची प्रेरणा मिळाल्याने त्यांच्याच नावाचा म्हणजे ‘सुभद्रा’ ब्रॅण्ड प्रवीणने विकसित केला आहे.

प्रवीण यांनी हळदीची शेती पूर्णपणे सेंद्रिय organic turmeric farming  केली आहे. ते सांगतात की आजीने आणलेले वाण सेलम किंवा गावरान असावे. मार्च- एप्रिलमध्ये शेत तयार केले जाते. जूनच्या पहिल्या आठवड्यात एकरी 8 ते 9 ट्रॉली शेणखत, शंभर किलो निंबोळी पेंड यांचा एकत्रित वापर केला जातो. गादीवाफे आणि ठिबक पद्धतीचा अवलंब केला जातो.

शेणखतासाठी घरची आठ जनावरे आहेत. लागवडीच्या पंधरा दिवसांनी ते हळद organic haldi powder  निघेपर्यंत सात महिन्यांपर्यंत दर पंधरा दिवसांनी जिवामृत स्लरीचा एकरी दोनशे लिटर प्रमाणे वापर करण्यात येतो. बेसनपीठ, गूळ, शेण- गोमूत्र, वडाखालील माती आदींचा त्यात समावेश असतो.

लागवडीनंतर दोन महिन्यांनी प्रति एकरी 20 गोण्या याप्रमाणे साडेसात ते आठ क्विंटल कोंबडी खताची मात्रा देण्यात येते.
नऊ महिन्यांनंतर काढणी करून कंद उकडून घेतात. पंधरा दिवस वाळवणी करून हळकुंडाला पॉलिश आणि मागणीनुसार पावडर निर्मिती करण्यात येते.

एकरी उत्पादन खर्च 40 ते 50 हजार रुपये होतो. आजीने लागवड केलेल्या हळदीपासूनच आम्ही बेणेनिर्मिती करतो. यासाठी एकरी सात ते आठ क्विंटल बेणे लागते. फेब्रुवारी-मार्चमध्ये काढणी केल्यानंतर निवडक कंद काढून जमिनीत एके ठिकाणी गाडून ठेवण्यात येतात.

2015 साली दुष्काळाचा फटका, पशुखाद्याचे वाढते दर आणि दुधाचे पडलेले दर यात आर्थिक ताळमेळ न बसल्याने यापूर्वीचा दुग्धव्यवसाय त्यांना बंद करावा लागला. मात्र खचून न जाता झरेकर कुटुंबाने अन्य पिकांसह हळद आणि त्याचे मूल्यवर्धन करून आर्थिक सक्षमता प्राप्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here