nuclear medicine centre in ahmednagar देश जगातील आरोग्य हब बनणार

nuclear medicine centre in ahmednagar
nuclear medicine centre in ahmednagar

अहमदनगर

nuclear medicine centre in ahmednagar पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या आरोग्य व्यवस्थेला विकासाशी जोडल्याने देशातील आरोग्य व्यवस्थेत अमूलाग्र बदल होत आहेत. देश जगातील आरोग्य हब बनणार असून आरोग्याच्या  संदर्भात पुढील अनेक वर्षांचे धोरण निश्चित करून संशोधनाला गती दिल्यामुळे देश आज खंबीरपणे उभा असल्याचे असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी व्यक्त केले.

in article

पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील vikhe patil hospital फौडनशच्या वतीने विकसीत करण्यात आलेल्या कॅन्सर सेंटर पेट स्कॅन pet scan for cancer in ahmednagar तसेच न्युक्लिअर मेडीसिन विभागाचे लोकार्पण मंत्री मांडवीय यांच्या .हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमास जेष्ठ समाजसेवक पद्मभूषण आणासाहेब हजारे पारनेर येथून दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.व्यासपीठावर आ.मोनिका राजळे आ.संग्राम जगताप माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले,प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ राजेंद्र विखे पाटील,भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरूण मुंढे शहर अध्यक्ष भैय्या गंधे,विश्वस्त वसंतराव कापरे सुभाष पाटील जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले जिल्हा आरोग्य अधिकारी संदीप सांगळे,यांच्यासह सर्व मान्यवर उपस्थित होते.
मंत्री मनसुख मांडवीय mansukh mandaviya यांच्या हस्ते पारनेर आणि पढेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण दूरदृष्य प्रणाली द्वारे करण्यात आले. ahmednagar

ahmednagar news marathi विखे पाटील परीवाराने सुरू केलेल्या सेवेच्या यज्ञाचे कौतुक करून मंत्री मांडवीय म्हणाले की,पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाखाली या देशात विविध क्षेत्रात संधी निर्माण होत आहेत तशाच संधी आरोग्य व्यवस्थेत सुध्दा उपलब्ध झाल्या आहेत.प्रधान मंत्र्यांनी देशाच्या आरोग्य व्यवस्थेला प्रथमच विकासाशी जोडले.स्वांतत्र्यानंतर हे प्रथमच घडले असल्याकडे लक्ष वेधून समाजाचे स्वास्थ्य चांगले असेल तरच राष्ट्राचे स्वास्थ्य चांगले राखले जावू शकते हा त्यांचा विचार प्रत्येक निर्णयामागे असल्याचे त्यांनी सांगितले.

देशात आरोग्य व्यवस्थेचे धोरण निश्चित करताना केवळ उपचार नव्हे तर प्रत्येक व्यक्तीला निरोगी जीवन जगता यावे यासाठी चांगली जीवनशैली विकसित करण्यासाठी सुविधांनी परीपूर्ण आशी आरोग्य केंद्र विकसित करताना चांगले वेलनेस सेंटर उभारण्यावर केंद्र सरकारने भर दिला असून,आतापर्यत १लाख २५ हजार वेलनेस सेंटर उभारण्यात आले असून दिडलाखाचे उद्दिष्ट लवकारच सरकार पूर्ण करेल असा विश्वास मंत्री मांडवीय यांनी व्यक्त केला.

देशाच्या विकासाला केवळ राजकारणाशी जोडून चालणार नाही, सरकार पाच वर्षे असते परंतू धोरण हे कायम राहीले पाहीजे,धोरण देशासाठी असते हे लक्षात घ्यायला हवे असे ठामपणे सांगतानाच राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशनचा निधी आता ग्रामीण भागातही वितरीत करण्याचा विचार सरकारने घेतला आहे. वैद्यकीय महाविद्यालयातील जागा वाढविताना यामागे आरोग्य सुविधासाठी मनुष्यबळ निर्माण करण्याचा प्रयत्न सरकारचा प्रयत्न केला ahmednagar news live असल्याचे मांडवीय म्हणाले.

औरंगाबाद रेल्वे स्थानकावर रेल्वे कोच देखभाल सुविधेचे ( पीट लाईनचे ) भूमीपूजन केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते संपन्न

कोव्हीड काळात आरोग्य यंत्रणेचे व्यवस्थापन कसे करणार असा प्रश्न निर्माण झाला असताना सरकारने समाजातील सर्व घटकांचा विचार करून कोणीही उपाशी राहाणार नाही याचा विचार केला यामागे सुध्दा वसुधैव कुटूंबकम हीच भावना होती. संशोधकांच्या पाठीशी सरकारने ठामपणे उभे राहून कोव्हीड लसीकरणाचे उत्पादन केले.त्यामुळेच मोदीजींच्या नेतृत्वाखाली देश आत्मनिर्भरतेने उभा राहीला.
येणार्या काळात भारत देश मेडीकल टुरीझम म्हणून विकसित करण्यावर सरकारने लक्ष केंद्रीत केले असून,नवीन भारताची निर्मिती स्वस्थ समाज समृध्द राष्ट्र या विचारानेच होत असल्याचे त्यांनी सांगितले.

खा.डॉ सुजय विखे पाटील यांनी आपल्या भाषणात केंद्र सरकाराच्या माध्यमातून लोकसभा मतदारसंघात होत असलेल्या आरोग्य सेवेचा आढावा घेतला.पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील यांच्या दूरदृष्टीतून या भागात विखे फौडेशनने निर्माण केलेल्या मेडीकल एज्युकेशन vikhe patil medical college आणि आरोग्य व्यवस्थेचा कोव्हीड संकटात समाजाला मोठा फायदा झाला असल्याचे सांगितले.प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डाॅ राजेंद्र विखे पाटील यांच्या हस्ते मांडवीय यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमास भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते फौडेशनचे सर्व पदाधिकारी डाॅक्टर विद्यार्थी मोठ्या संख्येने  उपस्थित  होते.

जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी आपल्या भाषणात पारनेर मध्ये आरोग्य केंद्राची वास्तू निर्माण करण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद व्यक्त करून एकादा राळेगण परीवाला भेट देण्यासाठी येण्याचे निमंत्रण दिले.पारनेर यैथील आरोग्य केंद्राची वास्तू ही गुणात्मक असेल असे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here