सासूचे २५ तोळ्याचे दागिने चोरताना जावई cctv त कैद

Nashik crime news

 

 

in article

नाशिक

Nashik crime news नाशिकमध्ये जावयाने चक्क आपल्या सासूच्या बंद घरात भरदिवसा सुमारे साडेदहा लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याचे उघडकीस आले.

गंगापूर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत या घरफोडीचा छडा लावत जावयाला बेड्या ठोकल्या.

अधिकृत रिमोट पायलट प्रशिक्षण संस्था म्हणून महात्मा फुले कृषि विद्यापीठास मान्यता

गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ध्रुवनगर भागात राहणाऱ्या मीरा गंभिरे (वय ५०, रा. बालाजी पॅराडाईज) यांच्या घरी अज्ञात चोरट्याने घरफोडी केल्याची घटना घडली होती.

या घरफोडीत सुमारे १० लाख ४७ हजारांचे दागिने चोरी झाल्याची फिर्याद गंभिरे यांनी दिली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख यांनी त्वरित घटनास्थळी भेट देत पाहणी केली.

यावेळी येथील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, त्यामध्ये संशयित चोरटा कैद झाल्याचे आढळले. सीसीटीव्ही फुटेजवरून त्याच्या वर्णनाआधारे अंदाज बांधून फिर्यादीकडे विचारपूस केली असता, गंभिरे यांचा मखमलाबाद रोडवर राहणारा जावई संशयित आलोक दत्तात्रय सानप (वय २३) यास ताब्यात घेतले.

त्याची कसून चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्या घराची झडती घेत पोलिसांनी ९ लाख ३२ हजार ४०० रुपयांचे २४९ ग्रॅम सोन्याचे दागिनेही हस्तगत केले आहेत. सानप यास पोलिसांनी अटक करून त्याच्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here