Ganesh chaturthi 2021 ची सर्व जण वाट पाहत असतात. आपल्या लाडक्या गणरायाचे आगमन म्हणजे सर्व थोरामोठ्यांसाठी आनंदाचा क्षण असतो.
राज्यात गणेशाचे पर्व सुरु झाल्यानंतर विविध आकाराचे,विविध अवस्थेतील गणेशाची रूपे आपणास पहावयास मिळतात.तसेच वेगवेगळ्या माध्यमातील रूपे समोर येतात.
असेच राज्यातील एकमेव गणेशाचे रूप पहावयाचे असेल तर तुम्हाला अहमदनगर जिल्ह्यातील आव्हाणे गावात जावे लागेल.तिथे तुम्हाला या निद्रिस्त गणेशाचे दर्शन होईल.(happy Ganesh chaturthi)
Ganesh chaturthi 2021:कसा आहे निद्रिस्त गणेश?
कोणत्याही मंगल कार्यापूर्वी गणेशाची आराधना केली जाते.अशीच आराधना या गावातील नागरिक या गणेशाची करतात.गावाच्या पश्चिमेला सुंदर हेमाडपंथी पद्धतीने बांधलेले विटांचे मंदिर आहे.या मंदिराच्या चोहोबाजूंनी जांभ्या दगडात बांधलेली तटबंदी पहावयास मिळते. मंदिरात गेल्यावर सभामंडप आणि गर्भगृह इथे नजरेस पडते.मंदिराच्या गाभाऱ्यात गेल्यावर समोर एक गणेशाची बैठी मूर्ती नजरेस पडते.त्या मूर्तीच्या समोर जमिनीपासून एक फुट खोल दक्षिणोत्तर झोपलेल्या स्थितीत हा गणेश आडवा पाहायला मिळतो.डाव्या सोंडेचा गणपती झोपलेल्या स्थितीत दिसतो.
दरवर्षी माघ महिन्यात या ठिकाणी मोठी यात्रा भरते. तर दर महिन्याच्या संकष्टी चतुर्थीला भाविकांची गर्दी उसळते.एरवी गावागावातून भाविक येथे दर्शनासाठी येत असतात.
happy Ganesh chaturthi गणेशाचे आगमन झाल्यावर दहा दिवसांचे वातावरण अगदी आनंदाने फुललेले असते. सर्व जण या गणेशाच्या सहवासात अगदी धुंद असतात. तर चिल्या-पिल्यांचे सांगायला नको.तेही खूप आनंदी असतात. happy Ganesh chaturthi चे मेसेज सर्वत्र गणपती उत्सवामध्ये पहावयास मिळतात.
Ganesh chaturthi 2021ऐतिहासिक माहिती
निद्रिस्त गणेशाच्या मंदिराची निर्मिती पुरातन आणि ऐतिहासिक आहे. या मंदिराला छत्रपती शाहू महाराजांच्या कालखंडात(सन १७०७ ते १७४९)सात गावांची जहागिरी देण्यात आली होती. तसेच ताम्रपट आणि सनद देण्यात आली. या सनदेवर छत्रपती शाहू महाराजांची सही आणि मोहर आहे.मोडी लिपीतील असलेली ही सनद चि.वि भालेराव यांच्याकडे आहे.

मंदिराचे प्रशासन गणपती देवस्थान पाहत आहे. मंदिराचा जीर्णोद्धार करून मोठा सभामंडप बांधण्यात आला आहे. भाविकांसाठी दर्शन रांगा आणि सुविधा या देवस्थानच्या माध्यमातून भाविकांना दिल्या जातात. याबाबत माहिती सांगताना देवस्थानचे अध्यक्ष मालोजीराव भुसारी यांनी सांगितले कि, “हे देवस्थान क वर्ग गटात असल्याने धार्मिक तीर्थक्षेत्र विकास योजनेतून निधी मिळाला असून मंदिराचा विकास करण्यात आला आहे.”
मंदिराच्या धार्मिक विधी करण्याचे काम आव्हाणे बुद्रुक येथील काकासाहेब भालेराव यांच्याकडे आहे.याबाबत त्यांनी सांगितले कि, टाळेबंदीच्या काळात मंदिर बंद आहे मात्र दर्शनासाठी भाविक येतात. त्यांना बाहेरून दर्शन दिले जाते. गणपतीची सकाळी आणि सायंकाळी आरती आणि विधिवत पूजा केली जाते.”
अष्टविनायकापैकी असेलल्या मोरगावच्या गणपतीचे हे ठाण समजले जाते. मात्र या गणेशाचे चिंचवड येथील मोरया गोसावी यांच्या निद्रिस्त अवस्थेतील समाधीचे साधर्म्य साधताना दिसतो.
Ganesh chaturthi 2021 राज्यातील एकमेव असलेल्या या निद्रिस्त गणेशाची मनोभावे पूजा करण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यातून भाविक येत असतात. happy Ganesh chaturthi त्यामुळे या गणेशाची कीर्ती सर्वदूर पसरली आहे.
कसे याल या गणेशाच्या दर्शनाला?
नगर पासून ६०- ७० किमी अंतरावर हे गाव आहे. औरंगाबाद हून नगर कडे येताना पांढरीपूलहून मिरी मार्गे ढोरजळगाव येथून ३ किमी अंतरावर हे गाव आहे. तर नगरहून येताना शेवगाव रस्त्यावर तिसगाव पासून शेवगाव कडे जाताना अमरापूर येथून आव्हाने फाटा लागतो तेथून तीन किमी अंतरावर जाता येते. तसेच शेवगावहूनही नगर कडे जातानाही येथे जाता येते. रस्ते पक्के असून थोडे फार खड्डे मात्र सहन करावे लागतील.
Read More:हरतालिका तीज महिलांचा उत्साह वाढविणारा सण
[…] आणखी वाचा : असाही गणपती […]