beed teacher morcha महात्मा गांधी जयंती दिवशी मराठवाडा शिक्षक संघाचा बीड धडक मोर्चा

beed teacher morcha
beed teacher morcha

सर्वांना जुनी पेंन्शन आणि शंभर टक्के अनुदान या व इतर मागण्यांसाठी पाचवा मोर्चा

जिल्हा, तालुका व शहर  कार्यकारिणीचे पदाधिकारी व सदस्य लागले कामाला; शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मुख्याध्यापक,  प्राध्यापक इ सर्व घटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…प्रचंड संख्येने सहभागी होण्याचे आवाहन..

in article

 

 

बीड

 

beed teacher morcha मराठवाडा शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष तथा मार्गदर्शक मा. पी. एस. घाडगे, व्ही. जी. पवार आणि जे. एम. सय्यद यांचे मार्गदर्शनाखाली मराठवाडा शिक्षक संघाचे विभागीय अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव, विभागीय सरचिटणीस  राजकुमार कदम आणि केंद्र कार्यकारिणीने मराठवाडाभर धडक मोर्चे काढण्याचा निर्णय घेतला.

अंशदायी पेंन्शन योजना रद्द करून सर्वांनाच जुनी पेंन्शन योजना old pension scheme  लागू करावी, निकषपात्र विनाअनुदान शाळा वर्ग आणि तुकड्यांना प्रचलित अनुदान सुत्रा नुसार शंभर टक्के  अनुदान देवून या शाळांवर कार्यरत शिक्षकांची वेठबिगारी थांबवावी,  राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांना 10,20,30 या तीन लाभांची आश्वासीत प्रगती योजना लागू करावी,

तासिका तत्वावर काम करत असलेल्या प्राध्यापकांना नियमित प्राध्यापक म्हणून मान्यता देण्यात याव्यात, शिक्षक पाल्यांना पूर्वी प्रमाणेच मोफत शिक्षण देण्यात यावे,  सर्व शैक्षणिक संस्थांना सातव्या वेतन आयोगप्रमाणे वेतनेत्तर अनुदान द्यावे या व इतर मागण्यांसाठी मराठवाडाभर मोर्चे काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्याप्रमाणे नांदेड, धाराशिव अर्थात morcha in beed उस्मानाबाद, लातूर आणि जालना  मोर्चे संपन्न झाले. या मोर्चात चढत्या संख्येने सहभागी होऊन शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,  मुख्याध्यापक,  प्राध्यापक यांनी सहभागी होऊन आपला असंतोष,  रोष, नाराजी प्रकट केली आहे.

बीड जिल्ह्यातही मोर्चाची जोरदार तयारी सुरू आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी जगाला सत्याग्रहाचे हत्यार दिले. त्याचाच वापर करून ज्यांच्या राज्यावर सूर्य मावळत नव्हता अशा दमनकारी  ब्रिटिश सत्तेला देश सोडायला भाग पाडले.

त्याच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिवशी  मराठवाडा शिक्षक संघाचा शिक्षक आणि शिक्षण वाचविण्यासाठी मोर्चा निघणार आहे.

प्रचंड संख्येने सहभागी होऊन शिक्षक, मुख्याध्यापक,  प्राध्यापक,  शिक्षकेतर कर्मचा-यांनी प्रचंड संख्येने सहभागी होऊन आपला असंतोष प्रकट करावा असे आवाहन मराठवाडा शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष कालिदास धपाटे, जिल्हा सचिव गणेश आजबे , बंडू आघाव, अशोक मस्कले, नामदेव काळे, सुभाष शेवाळे, विजय गणगे, परवेज देशमुख, व्यंकटराव धायगुडे,

हनुमंत घाडगे, गोवर्धन सानप, मनोज सातपुते, तावरे डी.एम, दत्तात्रय चव्हाण, अविनाश काजळे,  युवराज मुरूमकर,  विनोद सवासे, अनुप कुसुमकर, श्रीधर गुट्टे, सुमंत गायकवाड,  विष्णू वळेकर, प्रदीप चव्हाण,  हेमंत धानोरकर, शेख आय. जे, एम.डी. डोळे, अशोक गाडेकर,  शिवाजी ढोबळे, जीवनराव थोरात, बाळासाहेब टिंगरे, दादासाहेब घुमरे,

बाळासाहेब काळुशे, शामसुंदर साळुंके,  सुनिल जाधव, श्रीनिवास काकडे,  हनुमंत गवारे, तुळशीदास सोळंके, जगदिश्चंद्र प्रेमचंद तोष्णीवाल, नदीम युसूफ,  पुरुषोत्तम येडे पाटील, संजय गोरे, अलिशान काझी, सुनिल नागरगोजे  सर्व

तालुकाध्यक्ष,  तालुका सचिव आणि जिल्हा,  तालुका,  शहर पदाधिकारी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here