खा.प्रितमताई मुंडे यांच्या पुढाकारातून राष्ट्रीय रस्ते प्राधिकरणा मार्फत रस्ते कामांसाठी  निधी मिळाला – अशोक लोढा

beed pritam munde news
beed pritam munde news

 बीड प्रतिनिधी

beed pritam munde news राष्ट्रीय रस्ते प्राधिकरणा मार्फत बीड जिल्ह्यातील रस्ते कामांसाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली. बीड मतदार संघात 213 कोटींचा निधी देऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते कामांना चालना दिली.

in article

भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, जिल्ह्याच्या खा. डॉ. प्रीतमताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आमदार  लक्ष्मण आण्णा पवार, आ.नमिता ताई मुंदडा, रमेशराव आडसकर, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, अक्षय मुंदडा भारतीय जनता पार्टीच्या या शिष्टमंडळाने 20 ऑक्टोबर 2021 मध्ये केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांची दिल्ली येथे  भेट घेऊन बीड जिल्ह्यातील विविध रस्ते प्रकल्प व कामा संदर्भात चर्चा करून, जिल्ह्याला भरीव निधी देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली होती. जिल्ह्यातील कोणताही रस्ते कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. अशी ग्वाही गडकरी यांनी देऊन, रस्ते विकास कामांना त्याच वेळी तत्वता: मान्यता दिली होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विकासाचा ध्यास असणारे मंत्री आणि नेते म्हणून देशभरात परिचित आहेत. लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्या आग्रहामुळे बीड जिल्ह्याला भरीव निधी मिळाला. अशी माहिती जिल्हा परिषद सदस्य अशोक लोढा यांनी देऊन मंत्री नितीन गडकरी व लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांचे बीडकरांच्या वतीने आभार व्यक्त केले.

भाजपा शिष्ट मंडळाला दिलेल्या ग्वाही नुसार बीड मतदार संघात 213 कोटी रुपयांचा

निधी देऊन शिरापूर धुमाळ ते च-हाटा फाटा, चहाटा फाटा ते श्री शिवाजी महाराज चौक, बार्शी नाका ते पांगर बावडी,पांगरबावडी ते जरूड फाटा या रस्त्यांचा समावेश आहे. रुंदीकरणासह सिमेंट कॉक्रेटचे रस्ते पूर्ण होणार आहेत. बीड विधानसभा मतदार संघातील प्रत्येक विकास कामावर भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांचे पूर्ण लक्ष असून,पंकजाताई व खासदार ताई यांच्या मार्गदर्शनाखाली विकास कामांना गती देण्याचे काम केले जाते. पंचवीस ते तीस वर्षापासून प्रलंबित असलेल्या अनेक विकास कामे हाती घेऊन, पूर्ण केले. आधि केले आणि मग लोकांना सांगितले.बीड मतदार संघातील महत्वाच्या रस्त्याला न्याय देण्यासाठी पंकजाताई व  खासदारताईंच्या नेतृत्वात दिल्ली गाठून बीड मतदार संघाला निधी मिळाला  यांच्या

खऱ्या अर्थाने मंत्री नितीन गडकरी साहेब आणि पंकजाताई मुंडे यांना धन्यवाद देऊन आभार व्यक्त केले पाहिजे. परंतु केवळ विकासाचा कांगावा करून फुकटचे श्रेय लाटण्याचा उद्योग  दोनही क्षीरसागर करत आहेत. जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी यापूर्वी श्रेय घेण्याच्या फंदात पडू नये हा सल्ला देऊनही त्यांच्या डोक्यात अद्यापही प्रकाश पडलेला नाही.  सत्ता आणि स्वार्थाच्या मोहात येईल त्या कामाचे श्रेय ओरबाडण्याचा प्रयत्न जनतेच्या नजरेत आला आहे. काळाबरोबर राजकारण बदलले. लोक जागृत झाले असून कोणते काम करण्याची क्षमता कोणाच्या अंगी आहे. आणि कोण टक्केवारीची अपेक्षा न करता जनतेच्या हितासाठी धडपडतो.  हे जनता उघड्या डोळ्यांनी पहात असते. याचे भान आमदाराला राहिले नाही. आयत्या पिठावर रेगोट्या मारत टक्केवारी घेऊन वर्क ऑर्डर विकणे. हा धंदा म्हणजे विकासाचे राजकारण नव्हे. क्षीरसागरांनी जनतेच्या डोळ्यात धुळ फेकण्यापेक्षा स्वतःच्या डोळ्यात इमानदारीचे अंजन लावून पारदर्शक राजकारण करण्याची तयारी ठेवावी असे आवाहन अशोक लोढा यांनी केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here