अंगणवाडी सेविकांना मिळणार हे नवीन गिफ्ट

beed anganwadi news
beed anganwadi news

 

बीड

in article

beed anganwadi news बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील जवळपास 3000 अंगणवाड्या स्मार्ट करण्यासाठी शासनाने निधी दिलेला आहे. स्मार्ट अंगणवाडी अंतर्गत प्रस्ताव दाखल करताना जागा उपलब्ध असेल तरच प्रस्ताव दाखल करावेत म्हणजे पुढील अडचणी येणार नाहीत असे प्रतिपादन महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज येथे केले.

त्या पुढे म्हणाल्या, दिवाळीपूर्वी  अंगणवाडी सेविका ना  भाऊबीज भेट तर मिळेलच शिवाय त्यांना शासकीय कामासाठी अँड्रॉइड मोबाईल beed anganwadi sevika gift देण्याची गोड बातमी सुद्धा लवकरच मिळेल, असे श्रीमती तटकरे यांनी जाहीर करताच अंगणवाडी सेविकांनी या निर्णयाचे टाळ्या वाजवून जोरदार स्वागत केले.

 

beed anganwadi sevika gift
beed anganwadi sevika gift

येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह आज सायंकाळी महिला व बालविकास विभाग जिल्हा परिषद, अंतर्गत उत्कृष्ट अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका पुरस्कार सोहळा आयोजीत करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक, यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थिती होते.

 

पुढे बोलताना श्रीमती तटकरे म्हणाल्या की, माझ्या अंगणवाडी ताईंचे करावे तेवढे कौतुक कमी आहे. कोरोनाच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता इतर कुटुंब सुदृढ करण्याचे त्यांनी केलेले कार्य अभिमानास्पद आहे.
महिला व बालविकास विभागतंर्गत महाराष्ट्रात जिल्ह्याने सर्वाधिक 17000 अंगणवाडी मदतनीस यांची भरती करून उत्कृष्ट आदर्श निर्माण केला आहे. शासनाने इयत्ता बारावी पासची अट ठेवली होती. मात्र आपल्याकडे उच्चतम शिक्षण घेतलेल्या महिलांनी अंगणवाडी ताई म्हणून जबाबदारी स्वीकारल्यामुळे भविष्यात निश्चितच अंगणवाडी मधून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

अंगणवाडी
अंगणवाडी

अंगणवाडी ताईंना शासकीय कामे मोबाईलद्वारे करावे लागतात त्यामुळे सरकारने त्यांना मोबाईल द्यावेत अशी त्यांची मागणी शासनाच्या विचाराधीन असून लवकरच यासंदर्भात त्यांना आम्ही गोड बातमी देणार आहोत. एवढेच नव्हे तर दिवाळीपूर्वी त्यांच्या अपेक्षा पेक्षा अधिक भाऊबीज भेट देण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पूर्वपरवानगी घेतली असल्याचे सांगितले. त्यामुळे दिवाळीपूर्वी भाऊबीज भेट देखील देण्याचे नियोजन होणार आहे.

बालविवाह रोखण्यामध्ये खूप अडचणी येतात परंतु त्या अडचणीवर मात करण्यामध्ये बीड जिल्हा प्रशासन यशस्वी झाले आहे. जिल्हाधिकारी यांच्या मागणीनुसार बीड येथे एक महिन्याच्या आत बालविवाह रोखण्यासाठी अद्ययावत रेसिडेन्सी कार्यालय देण्याचा प्रयत्न राहील असे स्पष्ट करून त्या म्हणाल्या,अंगणवाडी ताई सोबतच त्यांच्या कुटुंबीयांची सुद्धा आरोग्य तपासणी करण्यासंदर्भात शासन निर्णय घेत आहे.

अंगणवाडी सेविका महाराष्ट्र
अंगणवाडी सेविका महाराष्ट्र

लेक लाडकी ही महत्वकांक्षी योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्त्यामुळे एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींना तीन टप्प्यांमध्ये लाभ देण्यात येईल. एक लाख रुपये पेक्षा अधिक रक्कम त्यांना देण्यात येणार आहे. यासंदर्भात प्रशासनाने लवकरात लवकर प्रस्ताव तयार करावेत आणि शासनाकडे मंजुरीसाठी पाठवावेत असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यापुढे अंगणवाडीचे वर्ग जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीमधील एका खोलीमध्ये भरले जावेत यासंदर्भात ठोस कृती निर्णय घेण्यासंदर्भात देखील शासन निर्णय घेत आहे.

अंगणवाडी ताजी बातमी:  अंगणवाडी सेविका महाराष्ट्र यांना मिळणार android फोन

यावेळी जिल्हा परिषद अंतर्गत 13 अंगणवाडी पर्यवेक्षकांना उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले. तर 5 अंगणवाडी सेविकांना सन्मानित करण्यात आले. याशिवाय नवनियुक्त अंगणवाडी मदतनीस यांच्या नियुक्तीचे आदेश प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काही जणांना वाटप करण्यात आले.
“माझी कन्या भाग्यश्री” च्या लाभार्थ्यांना त्यांचा लाभ वाटप करण्यात आला.याशिवाय जिल्ह्यातील 14 बचत गटांना 1 कोटी 14 लक्ष रुपयाचा निधी देखील त्यांच्याहस्ते देण्यात आला.

अंगणवाडी सेविका महाराष्ट्र
अंगणवाडी सेविका महाराष्ट्र

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी महिला व बालविकास अधिकारी चंद्रशेखर केकान यांनी केले. तर मुख्य कार्यकारी अधिकारी श्री पाठक यांनी बीड जिल्ह्यातील अंगणवाडी स्मार्ट करण्यासाठी 127 कोटी रुपयांची मागणी करून माझी कन्या भाग्याची या योजनेअंतर्गत 50,000 आणि 25, 000 रकमेमध्ये शासनाने वाढ करून एक लक्ष रुपये निधी मंजूर करावा. ज्या जिल्ह्यामध्ये मुलींच्या जन्माचे प्रमाण कमी आहे त्या जिल्ह्यात हा निर्णय प्रभावीपणे राबवावा. पीडित महिलांसाठी बीड जिल्ह्यात एकच स्वआधारग्रह आहे.

याशिवाय अंबाजोगाई आणि परळी या दोन ठिकाणी आणखीन स्वआधारग्रह उभा करण्यात यावेत अशी मागणी केली. जिल्हाधिकारी यांनी बीड जिल्ह्यामध्ये चार लाखापेक्षा अधिक मजुरांचे ऊस तोडीसाठी स्थलांतर होते. यावेळी महिलांनी ऊस तोडीसाठी स्थलांतर करू नये म्हणून त्यांचे मन परिवर्तन करण्यासाठी लोकप्रतिनिधीनी पुढाकार घ्यावा तसेच बालविवाह रोखण्यासाठी सुद्धा गाव पातळीवर लोकप्रतिनिधींनी जनजागृती करणे नितांत गरजेचे आहे असे मत व्यक्त करून अंगणवाडी ताईंनी देखील बालविवाह थांबवण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.

या कार्यक्रमाला जिल्हाभरातून अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका महिला व बालविकास विभागाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here