beed agri milet जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत शासनाच्या योजनांचे अधिकाधिक लाभ पोहचण्‍यासाठी काम करुयात-जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे

beed agri milet
beed agri milet

जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत कृषी स्पंदन महोत्सवाचे उद्घाटन.

बीड,

in article

beed agri milet जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत शासनाच्या विविध योजनांचे अधिकाधिक लाभ पोहचवता येईल यासाठी काम करुयात. आपण कृषी विभागाच्या सोबत आहे. कृषी शाखेतून शिक्षण झाले असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी आणि गरजांची जाण आहे. मी स्वत: शेती, विहीरी, पीक अशा बाबींशी निगडीत राहीले आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंढे यांनी केले.

beed agri milet
beed agri milet

कृषी विभाग जिल्हा बीड अंतर्गत अधिकारी, कर्मचा-यांच्या कला, क्रीडा व सांस्कृतीक महोत्सव कृषी स्पंदन कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंढे यांच्या हस्ते जिल्हा क्रीडा संकुल बीड येथे करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर चिंचाणे,  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बीड  बी. के. जेजुरकर, जिल्हा कोषागार अधिकारी दिलीप झिरपे, जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री.जटाळे, अग्रणी बॅंक व्यवस्थापक बिजेंदु झा, उपविभागीय कृषी अधिकारी एस.एम.साळवे यांच्यासह कृषी विभागातील सर्व तालुक्यातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

            याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन होऊन कार्यक्रमास सुरवात करण्यात आली. कृषी विभागाच्या तालुकास्तरीय, उपविभागीयस्तरावरील कार्यालयांनी पथकांनी विविध संकल्पनांवर आधारीत वेषभूषा, कृषी योजनांची माहिती देणारी फलकं, आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2023 बाबत माहितीचे प्रदर्शन करणारा चित्ररथ, तृणधान्यांच्या वापरापासून बनवलेले पदार्थ-पेय व  त्यांची माहिती देत संचलन  केले. यातून छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज, वासुदेव आदींसह महाराष्ट्राच्या प्रेरणादायी परंपरांचे दर्शन झाले.

यावेळी जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नाचणी, वरई,राजगीरा अशा विविध तृणधान्य व त्यांच्यापासून बनवलेल्या पदार्थांची माहिती घेतली व ताक या पेयाचा आस्वाद घेतला.

            याप्रसंगी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्रीमती मुधोळ-मुंडे म्हणाल्या, कृषी स्पंदन हा महोत्सव एकाच वेळी कृषी , तृणधान्य आणि क्रीडा अशा तीनही घटकांचा संदेश देणारा असून आनंदाचा अनुभव देत आहे. या आंतरराष्ट्रीय तृणधान्या मिशनसाठी मी शुभेच्छा देते. पथसंचलनातून चांगली माहिती देण्यात आली आहे. क्रीडा स्पर्धां उत्साह व उर्जा वाढवण्यासाठी महत्वाच्या आहेत असे त्यांनी सांगितले.

            जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.पवार म्हणाले, तृणधान्याच्या आरोग्यदायी उपयोगाबाबत जागतिक पातळीवर संशोधन होत आहे. भारतात तृणधान्याचा वापर वाढण्यासाठी मोठे काम केले जात आहे, कृषीक्षेत्राच्या वाहकांच्या खांद्यावर याची जबाबदारी आहे असे त्यांनी सांगितले.

            स्वागत व प्रास्तविक जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री जेजुरकर यांनी केले, ते म्हणाले आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2023 आपण साजरे करत आहे. याचे महत्व सर्वांपर्यत पोहोचवण्यासाठी कृषी विभाग काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

beed agri milet
beed agri milet

यावेळी जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी क्रिकेटच्या स्पर्धेत सहभागी संघाना टॉस करुन व फलंदाजी करुन शुभारंभ केला.

कृषी स्पंदन महोत्सव दोन दिवस होणार असून यामध्ये विविध क्रिडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम होत आहेत. यामध्ये 18 फेब्रुवारी 2023 रोजी जिल्हा क्रीडा संकुल आणि चंपावती क्रिडा मंडळ यांच्या विविध क्रिडा स्पर्धा आणि सांयकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत जिल्हा क्रिडा संकुल बीड येथे पारितोषिक वितरण समारोप समारंभ होणार असून सर्व तालुका कृषी अधिकारी,बीड जिल्ह्यातील सदस्य यांनी कृषी, कला, क्रीडा व सांस्कृतीत महोत्सवासाठी उपस्थित राहणार आहेत.

या कृषी स्पंदन महोत्सवासाठी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री जेजुरकर यांचे मार्गदर्शनाखाली

कृषि उपसंचालक ए. एच. बनकर, उपविभागीय कृषी अधिकारी एस.एम.साळवे, एस. एच मडके, एस. व्ही. वडखेलकर, सर्व  जिल्हातील कृषी अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here