बागेश्वर बाबावर  गुन्हा दाखल व्हायला हवा; विखे पाटील

लोणी

bageshwar dham चे धीरेंद्र महाराजांनी जे साईबाबा बद्दल जे वक्त्यव्य केले ते चुकीचे असून मी त्याचा निषेध करत असल्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.त्यांच्यावर शासनानाने कारवाई करण्याची गरज असल्याचे सांगितले.

in article

लोणी येथे ते पत्रकारांशी बोलत होते.

गिधड कि खाल पहनकर कोई शेर नही हो सकता” असे वक्तव्य बागेश्वर धाम चे धीरेंद्र कृष्ण शास्त्री  यांनी केले आहे.
या वक्तव्यानंतर शिर्डी सह राज्यातील साई भक्तांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

या शास्त्रीचा समाचार घेत विखे पाटील म्हणाले की,

सातत्याने असे साईबाबा बद्दल वक्त्यव्य करण्याचे  चुकीच काम करत आहेत . हे सवंग लोकप्रियता मिळविण्यासाठी च थोतांड आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीने  दिलेले आव्हान स्वीकारू शकले नाही. त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करावेत. बाबा लोक  लोकांचे बुद्धीभेद करतात. धार्मिक तेढ निर्माण करतात. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साईबाबा आहेत, श्रद्धा दिलेलेसबुरी चा  संदेश साई बाबा देतात.
श्रद्धेवर चिखलफेक करण्याचा अधिकार कोणालाही दिलेला नाही . महाराष्ट्र संतांची भूमी आहे. संतांनी लोक जागृतीतुन समाज निर्माण करण्याचे काम केले आहे.

तथाकथित महाराज त्यांच्या वर कारवाई करण्याची गरज आहे. धर्माचा काय प्रचार करायचा तो करा, दुसऱ्याचा अपमान करण्याचा अधिकार नाही . असे खडे बोल विखे यांनी सुनावले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here