माजी मंत्री आमदार बच्चु कडू यांना दोन वर्षे शिक्षा

bacchu kadu news
bacchu kadu news

माजी मंत्री आमदार बच्चु कडू यांना दोन वर्षे शिक्षा

नाशिक-

in article

bacchu kadu news माजी मंत्री आणि आमदार बच्चू कडू यांनी नाशिक महापालिकेच्या माजी आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्याशी वाद घातला होता. या प्रकरणी नाशिकच्या न्यायालयाने त्यांना दोन वर्षे शिक्षा ठोठावली आहे.

आज सुनावलेल्या या शिक्षेनंतर आमदार कडू यांनी तातडीने जामिनासाठी वरीष्ठ न्यायालयात अर्ज केला आहे.
२०१७ मध्ये महापालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या बाबतीत ही घटना घडली होती.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष निवडीत भाजपची सरशी; शिवाजी कर्डिले अध्यक्ष

महापालिकेच्या अर्थसंकल्पात दिव्यांगासाठी निधीची तरतूद करणे बंधनकारक असते तसेच त्याचा खर्च देखील करणे आवश्यक असते. मात्र, तो होत नसल्याच्या कारणावरून प्रहार संघटनेचे नेते म्हणून बच्चू कडू bacchu kadu आयुक्तांच्या दालनात आले होते.

बेालताना त्यांनी संताप व्यक्त केला होता. दरम्यान यानंतर महापालिकेने बच्चू कडू यांच्याविराेधात भादंवि ५०४ आणि ३५३ या कलमान्वये पेालीसांत तक्रार केली हेाती.

यातील ५०४ म्हणजेच ओरडून बेालणे आणि ३५३ म्हणजे सरकारी कामात अडथळा या देान्ही कलमान्वये त्यांना प्रत्येकी एकेक म्हणजे दोन वर्षांची शिक्षा झाली आहे. यासंदर्भात वरीष्ठ न्यायालयात आमदार कडू यांनी तातडीने उच्च न्यायालयात अर्ज केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here