महिलेने कशी केली सफरचंद, खजूर आणि ड्रॅगन फ्रुटची संमिश्र शेती? जाणून घ्या

agriculture bussiness ideas
agriculture bussiness ideas

 

शेती म्हणजे आतबट्ट्याचा धंदा, पण हा व्यवसाय जर चिकाटी आणि मेहनतीने केला तर सीताफळाला पण केळ येऊ शकते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यासाठी आपल्याला agriculture bussiness ideas शोधाव्या लागतील. आष्टी तालुक्यातील एका महिलेने आपल्या शेतात विविध पिके घेऊन बहुफळ पिके पद्धती जोपासली आहे. त्यात विशेष म्हणजे या महिलेने चक्क सफरचंदाची शेती केली आहे.

in article

 

जाणून घेऊ या  काय आहे farming business ideas या बहुफळ पीक शेतीचा प्रयोग

 

सफरचंद apple cultivation या फळ झाडाची हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये येणारे फळ अशी ओळख आहे. त्यामुळे महाराष्ट्रासारख्या apple farming in maharashtra भागात त्याची फारशी लागवड दिसत नाही.ड्रॅगन फ्रुट हे परदेशी फळ आणि खजूर हे वाळवंटी प्रदेशात येणारे पीक. पण या  तीनही वेगवेगळ्या हवामानात येणाऱ्या पिकांची एकत्रित शेती केली आणि तीही यशस्वी पणे.

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील केळसांगवी या गावातील विजया गंगाधर घुले असे या शेतकरी महिलेचे नाव आहे.  त्यांच्या कडे ४ एकर शेती आहे. त्यापैकी दोन एकरात त्यांनी ड्रॅगन फ्रूट blue dragon fruit या फळ पिकाची लागवड केली आहे. तर उर्वरित दोन एकरात सफरचंद आणि खजूर या पिकाची लागवड केली आहे.

गेल्या वर्षीपासून सफरचंद च्या झाडाला फळे लागण्यास सुरुवात झाली. यंदा या फळाचे दुसरे वर्ष आहे. या महिलेने सफरचंदाच्या झाडांची जोपासना करून या तीन वर्षात त्याला फळधारणा करण्याचा apple farming प्रयोग यशस्वी केला आहे.

या भागातील शेतकऱ्यांना लागली लालचुटुक फळांची गोडी !

सफरचंद,खजूर आणि ड्रॅगन फ्रूट dragon fruit plant  ही काही महाराष्ट्रात येणारी पारंपरिक फळ झाडे नाहीत. मात्र विजया घुले यांनी आपल्या बाहेरगावी नोकरी करणाऱ्या दोन मुलांच्या मदतीने या तिन्ही पिकांची यशस्वी लागवड करून त्यापासून उत्पादन मिळवण्याची किमया केली आहे .

श्रीमती घुले यांच्याकडे चार एकर शेती असून त्यापैकी दोन एकर क्षेत्रात ड्रॅगन फ्रुट dragon fruit  आहे. त्यापासून ते उत्पन्न मिळवत आहेत. ड्रॅगन फ्रुट dragon fruit tree शेतात त्यांनी खजुराचे आंतरपीक घेतले आहे. त्या झाडांना छोट्या आकाराची खजूर येण्यास सुरुवात झाली आहे . तर एक एकर मध्ये 2020 मध्ये हिमाचलमधून आणलेल्या हर्मन जातीच्या सफरचंदाची २४० रोपे लावले होती. ही रोपे आता झाडांमध्ये रूपांतरित झाले असून त्यावर प्रत्येकी 40 ते 50 एवढ्या संख्येने सफरचंद लगडलेले आहेत.

येत्या जून मध्ये हे सफरचंद विक्रीसाठी तयार होतील . मराठवाड्यामध्ये पारंपारिक फळझाडांऐवजी सफरचंद , ड्रॅगन फ्रुट आणि खजूर यासारखी आगळी पिके घेऊन त्यापासून उत्पादन मिळवण्याचा प्रयोग घुले यांनी यशस्वी केला आहे. सफरचंद म्हणजे थंड प्रदेशात येणारे फळ ही ओळख घुले यांच्या प्रयोगाने बदलली आहे.अशा प्रकारच्या agri business ideas, वापरल्या तर नक्कीच शेतकरी फायद्यात राहील यात शंकाच नाही.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here