अंबाजोगाई न्यायालय बांधकामासाठी आराखड्यास मान्यता

होळी

धनंजय मुंडेंच्या आणखी एका पाठपुराव्यास यश

 

मुंबई दि २ मार्च, प्रतिनिधी

in article

अंबाजोगाई तालुकास्तरीय न्यायालयाच्या इमारत बांधकामाच्या पहिल्या मजल्याच्या कामासाठी ७ कोटी ८० लाख रुपयांच्या आराखड्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या पाठपुराव्यास यश आले.

राज्य शासनाच्या विधी विभागाचे सहसचिव नितीन जीवन यांच्या स्वाक्षरीने याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला असून, याद्वारे इमारतीच्या पहिल्या मजल्याच्या बांधकामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

अंबाजोगाई येथील तालुकास्तरीय न्यायालयाच्या इमारती मध्ये बांधकामासह, न्यायदान कक्ष, लिफ्ट, अंतर्गत व बाह्य विद्युतीकरण, पाणी पुरवठा, मलनि:सारन, फर्निचर, रेनवॉटर हार्वेस्टिंग, अग्निशमन यंत्रणा, सोलार, बगीचा आदी पायाभूत सुविधांसाठी हा निधी खर्च करण्यात येणार आहे.

ना. धनंजय मुंडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे, विधी व न्याय विभागाच्या राज्यमंत्री ना. अदितीताई तटकरे यांच्याकडे पत्रव्यवहार करून सातत्याने पाठपुरावा केला होता. सदर बांधकामाचे अंदाज पत्रक दाखल केल्यानंतर मा. मुख्यमंत्र्यांनी यास हिरवा कंदील दाखवला आहे.

आणखी वाचा :२२१ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर तर १५९ रूग्णांना डिस्चार्ज

मंजूर करण्यात आलेल्या ७ कोटी ८० लाख रुपयांपैकी ४ कोटी २३ लाख रुपये पहिल्या मजल्याच्या बांधकामासाठी वापरण्यात यावेत व उर्वरित रक्कम अन्य पायाभूत सुविधा उभारण्यासाठी वापरण्यात यावी असेही सदर शासन आदेशद्वारे संबंधित यंत्रणेला निर्देशित करण्यात आले आहे. दरम्यान जिल्ह्यातील महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या अंबाजोगाई तालुका न्यायालयाच्या इमारत बांधकामासाठी मुबलक निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ना. मुंडे यांनी मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे व उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजितदादा पवार तसेच विधी व न्याय विभागाच्या राज्यमंत्री ना. अदितीताई तटकरे यांचे आभार व्यक्त केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here