हरिश्चंद्रगड अभयारण्यात शेकरु संख्या दिड पट स. वन संरक्षक गणेश रणदिवे

 हरिश्चंद्रगड

डाउनलोड करा 1

 

 राजूर ,

हरिश्चंद्रगड अभयारण्यातील भंडारदरा वन्यजीव व राजूर वन्यजीव वनपरिक्षेत्रात महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरु या वन्य प्राण्यांची प्रगणना करण्यात आली.

सुनिल लिमये साहेब अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)  वनसंस्थळ पश्चिम मुंबई मा.  अनिल अंजनकर वन्यजीव नाशिक  गणेश रणदिवे सा. वनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली राजुर वन्यजीव वनपरिक्षेत्रात दिनांक २७/०५/२०२१ ते ३/०५/२०२१ पर्यंत महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरु या वन्य प्राण्यांची प्रगणना करण्यात आली प्रगणनेसाठी संरक्षण मजुर, वनरक्षक वनपाल यांनी शेकरु चे घरटे (जुने, नवे) प्रत्यक्ष दिसलेले

डाउनलोड करा 2

शेकरु  प्रगणना करण्यात आली आहे.

 हरिश्चंद्रगड- अभयारण्यात ९७  शेकरू आढळले आहेत.

यामुळे शेकरूंच्या संख्येत यंदा मागील वर्षीपेक्षा दिडपट वाढ झाल्याचे नुकत्याच झालेल्या शिरगणतीनुसार स्पष्ट झाले आहे.

वन्यजीव विभागाच्या माहितीनुसार या अभयारण्यात आतापर्यंत शेकरू ची ३९६  घरटी आढळली आहेत.

मात्र, त्यांची संख्या ९७  असून  कोथळे ४३,विहीर २० , लव्हाळी १७ ,पाचनई१४ , कुमशेत ३  शेकरू आहेत  ही संख्या वाढल्याने वन्यप्रेमींनी समाधान व्यक्त केले आहे.

पावसाळा सुरू होण्यापूर्वी शेकरू नवीन घरटी बनवितात. या मुळे शेकरूंची गणना मे मध्ये केली जाते.

पहिल्या टप्प्यात शेकरूंची संख्या प्राप्त झाली असून हे सर्वेक्षण जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरू असते.

त्यामुळे अंतिम आकडा हा जूनमध्ये मिळेल, असे वन विभागाचे मत आहे. ही गणना ‘जीपीएस’ या तंत्राद्वारे केली जाते.

यंदा केलेल्या गणनेत शेकरूंचा आकडा वाढू शकतो, अशी आशा स. वनसरंक्षक गणेश रणदिवे  यांनी व्यक्त केली आहे.

इतरत्र त्यांचा अधिवास आहे का, याचा अभ्यास करणार असल्याचे वनक्षेत्रपाल डी. डी.पडवळ यांनी सांगितले.

अकोले तालुक्यात

तळकोकणातही शेकरूंचे दर्शन

वजन दोन ते अडीच किलो, लांबी अडीच ते तीन फूट असलेल्या शेकरूंची डोळे गुंजीसारखे लाल असतात.

त्याला मिशा, अंगभर तपकिरी तलम कोट आणि गळ्यावर, पोटावर पिवळसर पट्टा, झुबकेदार लांब शेपूट असते शेकरू वर्षातून एकदाच डिसेंबर-जानेवारीमध्ये पिलाला जन्म देते.

एक शेकरू झाडाच्या बारीक फांद्यावर सहा ते आठ घरटी तयार करते ते १५ ते २० फुटांची लांब उडी मारू शकते.

विविध फळे व फुलांतील मध हे त्याचे खाद्य असते. महाराष्ट्रात भीमशंकर, कळसूबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य, आजोबा डोंगररांगांमध्ये, माहुली, वासोटा, मेळघाट, ताडोबात शेकरू आढळतात.

शेकरू हा अतिशय देखणा आणि झपाट्याने दुर्मिळ होणाऱ्या प्रजातीतील प्राणी आहे.

सह्याद्रीच्या रांगांमध्ये दाट जंगलांत त्यांचे वास्तव्य असते. अलीकडे मात्र तळकोकणात वस्त्यालगत त्यांची संख्या वाढली आहे.

दाट लाल रंगाचा, आकर्षक, शेपटी असलेल्या शेकरूंच्या जोड्या नारळाच्या बागांमधून लीलया उड्या मारताना दिसतात..

कोरोना मुळे शेकरू ची नोंद करण्याचे काम काही अंशी झाले असून हरिश्चंद्रगड अभयारण्यात वापरातील व वापरात नसलेली ३९६  घरटी आढळली असून एकूण ९७  शेकरू या परिसरात असून कळसूबाई घाटघर परिसरात १७ शेकरू असून तेथेही ४३ घरटी आढळली आहेत.

गतवर्षी प्राणी पक्षांसह अभयारण्य क्षेत्रात २८० प्राणी व ४५० पक्षी आढळल्याची माहिती वनाधिकारी पडवळ यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here