सांदणदरी ला जाण्यास वनविभागाची बंदी.

सांदणदरी 

सांदणदरी ला जाण्यास वनविभागाची बंदी.

अकोले-akl11p2 सांदणदरी येथे जाण्यास  पर्यटक बंदी करण्यात  आली असून या भागात कुणी  जाणीवपूर्वक जाण्याचा प्रयत्न केल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांनी दिली आहे .या परिसरात जोरदार पर्जन्य वृष्टी होत असून दरीत मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे.नुकताच काही पर्यटक या ठिकाणी जाऊ नका सांगत असताना उतरले व त्यात ते अडकले त्यांना वनविभाग कर्मचारी व स्थानिक ग्रामस्थांनी यशस्वी ऑपरेशन करून घळीतून बाहेर काढले त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे .या घटनेनंतर वनविभागाने या परिसरात जाण्यास बंदी घातली आहे.

एका अतिप्राचीन जिओग्राफिक फॉल्टलाईन (भौगोलिक प्रस्तरभंग रेषा) म्हणजे जमिनीला पडलेली एक मोठी भेग यामुळे निर्माण झालेली ही दरी किंवा घळ हा निसर्गाचा अद्भुत असा चमत्कारच आहे. असच एक

सह्याद्रीनव म्हणजे सांदणदरी 

 

IMG 20210611 WA0264

सांदणदरी सह्याद्रीच्या रुपापुढे फक्त या नतमस्तक व्हायच…. आपण कितीही मोठे झाले असलो तरी या सह्याद्रीच्या निसर्गाच्या पुढे किती खुजे आहोत याची जाणीव यांच्या नुसत्या दर्शनाने आपल्याला होते. सांदण दरीचे वैशिष्ठ म्हणजे ही जमिनीच्या पातळीखाली आहे. इथे खाली थोडेसे उतरावे लागते. घळीच्या सुरुवातीलाचा एक जिवंत झरा आहे जो कधीही आटत नाही. सांदण दरी दोनशे ते चारशे फुट खोल आणि जवळ १ कि.मी लांबवर पसरलेली आहे. पावसाळ्यात सांदण दरीला जाणे अशक्य असते कारण पावसाच पाणी याच दरीतुन खाली कोसळते. त्यामुळे येथे जाण्याचा उत्तम कालावधी म्हणजे उन्हाळा. दरीतील ऊन सावल्यांचा खेळ बघण्यासारखा असतो.

राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपातर्फे संजय उपाध्याय यांचा अर्ज दाखल

दरीत गेल्यावर दोन पाण्याचे पुल लागतात. पहिला पुल २-४ फुट अन दुसरा पुल ४-६ फुट पाण्यात असतो. येथे हिवाळ्यात पण जाऊ शकतो पण पाण्याची पातळी तेव्हा थोडी जास्त असु शकते. सांदण दरीला जाण्यासाठी जाण्यासाठी साम्रद गाव गाठावे लागते. साम्रद ही छोटेखानी आदिवासी वाडी .

आशिया खंडातील दोन नंबरची व्हॅली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here