बीडमध्ये महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेस सुरूवात

बीडमध्ये महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेस सुरूवात

 

in article

बीड/प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १९ वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा या स्पर्धेची प्राथमिक फेरी बीड केंद्रावर यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे १४ आणि १५ जानेवारी २०२३ या कालावधीत पार पडणार आहे. या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ बलभीम महाविद्यालयाचे मराठी विभागाचे विभाग प्रमुख डॉ.मनोहर शिरसाठ, बलभीम महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ.केशव भागवत,पत्रकार प्रतीक कांबळे,नाट्य कलावंत प्रवीण वडमारे,जतीन वाघमारे यांच्या उपस्थितीत पार पडला.
महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक खात्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांच्या नियोजनात्मक भूमिकेतून १९ वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा पार पडत आहे त्या अनुषंगाने बीड हे औरंगाबाद केंद्राचे उपकेंद्र असून येथे एकूण १० बालनाट्य सादर होणार आहेत. शनिवारी दिनांक १४ जानेवारी २०२४ रोजी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेचे उद्घाटन पार पडले.या स्पर्धेला परीक्षक म्हणून सुहास जोशी, राजेश जाधव,वैशाली पाटील हे काम पाहणार आहेत. बीड जिल्ह्यातील नाट्य रसिकांनी या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेचा आनंद घ्यावा असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांनी केले आहे.
ही स्पर्धा पार पडण्यासाठी संचालक बिभीषण चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड केंद्र समन्वयक मुकुंद धुताडमल, प्रवीण निसर्गंध ,प्रवीण राठोड, वैभव निवारे,अक्षय कोकाटे, दिनेश पाटोळे,ऋषिकेश दाभाडे, राहुल साळवे आदी परिश्रम घेत आहेत.

असे होणार बाल नाटके सादर
ठोंब्या ठोंबीची गोष्ट,उस्मानची आई,बालपण नको रे देवा,सावली, डोंबारी, काश्मीर स्माईल, नवी प्रतिज्ञा, रेडिओ, बफरिंग,जीर्णोद्धार,ही सर्व बालनाट्य यशवंतराव चव्हाण नाट्यगृह बीड येथे दिनांक १४ जानेवारी ते १५ जानेवारी २०२३ या कालावधीत सकाळी १० वाजल्यापसून ५ वाजेपर्यंत होतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here