महिन्यापूर्वी झालेला बिबट्याचा मृत्यू गुलदस्त्यात ?

बिबट्याचा मृत्यू

 

 

in article

आष्टी -प्रतिनिधी

 

आष्टी तालुक्यातील मातावळी येथील डोंगरात बिबट्या मृत अवस्थेत सापडला. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा वन अधिकारी यांच्यासह वन विभागाने या स्थळाची पाहणी केली.या बिबट्याचा महिन्यापूर्वी मृत्यू झाला असावा असा कयास व्यक्त होत आहे. मात्र या बिबट्याचा कशाने मृत्यू झाला ? हे गुलदस्त्यात राहिले आहे.

बिबट्या मृत अवस्थेत सापडण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी देवळाली येथील डोंगरात बिबट्या मृत अवस्थेत मिळाला होता. त्यावेळीहि वन वनविभागाला तो थेट महिन्यानंतरच मिळाला होता. आता पुन्हा एका बिबट्याचा मृत्यू झाला. तोही अशाच अवस्थेत सापडला आहे. त्यामुळे त्याचे मृत्यूचे कारण हे गुलदस्तात राहिले आहे.

आणखी वाचा : त्या बिबट्याचा मृत्यू कि घातपात?

मातावळी येथील डोंगरात वन विभागासह पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी यांनी भेट दिली. जिल्हा वन अधिकारी तेलंग यांनीहि घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी या बिबट्याच्या नख्या आणि दात शाबूत आढळून आले. तसेच पावसामुळे शरीराचा कुजलेला काही भाग डोंगरावरून वाहून गेला होता. संपूर्ण वाढ झालेला हा बिबट्या होता. कुजलेल्या शरीरामुळे त्याच्या मृत्यूचे कारण शोधणे अवघड असल्याने अकस्मात मृत्यू झाला असल्याचे जाहीर करण्यात आले. तर त्याचा जवळच त्याचा अंत्यविधी करण्यात आला. यावेळी वन परिक्षेत्र अधिकारी श्याम शिरसाठ उपस्थित होते.

वन विभाग थंडावला

आष्टी तालुक्यात नरभक्षक बिबट्याची  दहशत होती तेंव्हा वन विभागाने महत्वाची कामगिरी केली होती. मात्र पुढे हा विभाग थंड झाल्याचे दिसते आहे. मागील मृत  बिबट्या  वन विभागला महिनाभरानंतर आढळून आला होता.मग आता ह्या बिबट्याची  वन विभागाला का खबर लागली नाही हे विशेष !

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here