काळया बाजारात जाणारे स्वस्त धान्य राजूर पोलिसांनी पकडले

काळया बाजारात

अकोले,

काळया बाजारात जाणारे स्वस्त धान्य राजूर पोलिसांनी पकडले असून त्याची उच्च स्तरीय चौकशी करून संबधित अधिकारी व ठेकेदार यांचेवर कारवाई न झाल्यास आदिवासी संघटना आक्रमक पवित्रा घेतील…

akl13p2

तालुक्यातील आदिवासी भागात स्वस्त धान्य मिळत नसल्याने उपासमारी होत असताना कोरोणा काळात त्यांचे

धान्य काळया बाजारात जात आहे .याचा निषेध करत आदिवासी विकास परिषद, पेसां सरपंच परिषद ,आदिवासी संघटना यांनी राजूर पोलिस स्टेशनच्या समोर असलेल्या कोल्हार घोटी रस्त्यावर तहसीलदार मुकेश कांबळे यांना अडवून त्यांचेकडे निवेदन देऊन आठ दिवसात अधिकारी व ठेकेदार यांचेवर कारवाई न केल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन केले जाईल .

यावेळी माजी आमदार वैभव पिचड ,सभापती सौ उर्मिला राऊत,उपसभापती दत्ता देशमुख,सरपंच गणपत देशमुख,पांडुरंग खाडे,सयाजी अस्वले,गंगाराम धींदले,सुरेश भांगरे,सुरेश गभाले,संतोष बनसोडे,गोकुळ कान काटे,तुकाराम खाडे,धोंडीबा साबळे, काळू साबळे,डॉ.अंनत घाणे,भरत घाणे,सुनील सारुक्ते,उपस्थित होते.

यावेळी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे .अकोले तालुक्यात कोरोणा रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहे मृत्यूचे प्रमाण अधिक आहे .मात्र तालुका प्रशासन मृत्यूची आकडेवारी चुकीची देऊन दिशाभूल करत आहे, रेमडीसिव्हर इंजेक्शन काळया बाजारात ऑक्सिजन बेड नाही,आदिवासी भागात आरोग्य कर्मचारी जात नाही .तर आलेली लस आदिवासींना न देता ती संगमनेर तालुक्यातील लोकांना दिले जात आहे . यावर तालुका प्रशासनाचे दुर्लक्ष्य आहे .

आदिवासी भागात उपासमारी होत आहे .स्वस्त धान्य गेल्या तीन महिन्यापासून मिळत नाही,तलाठी पंचनामा करत नाही रात्रीच्या वेळी रेशन वाहतूक होत आहे .तर दिवसाढवळ्या ट्रक मधून दुसऱ्या तालुक्यात धान्य काळया बाजारात विकल्या जात आहे .ठेकेदार राष्ट्रवादी पक्षाचा कार्यकर्ता संतोष परते हा असून ही ठेकेदारी तातडीने तहसीलदार यांनी रद्द करावी तसेच गोडाऊन किप र कर्मचारी कार्यालयात मद्य प्राशन करून कार्यरत आहेत .चार ट्रक मधून नेण्यात आलेले धान्य  स्वस्त धान्य सरकारी आहे .मात्र ट्रक अधिकृत नाही हे दस्तुर खुद तहसीलदार यांनी लेखी दिले असून याचा  चोरून धान्य नेल्याचा वेगळा गुन्हा दाखल करावा .राजकीय दबावाखाली न येता पोलिस विभागाने ऑन कॅमेरा तपास पंचनामा करावा . डाके ट्रान्सपोर्टचा ठेका असताना राजकीय लोकांना हा ठेका का दिला याची चौकशी होऊन कारवाई करावी अन्य था अधिक तीव्र आंदोलन केले जाईल .कोट मुकेश कांबळे (तहसीलदार)चार ट्रक मधून नेण्यात आलेले स्वस्त धान्य पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दखल केला आहे .यात कुणालाही पाठीशी घालणार नाही तसेच कोरोना संक्रमण होणार नाही लसी तालुक्यातील व्यक्तींना देण्यासाठी आदेश दिले आहेत.तर हलगर्जीपणा करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई केली जाईल . रेमिडीसिव्हर काळाबाजार होत असेल तर त्याबाबत कळवावे कारवाई करू.

 

Anil deshmukh,अखेर इडी ने केली अनिल देशमुख यांना अटक

in article

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here