आज २१९ रूग्णांना डिस्चार्ज तर ३२५ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर

४८४

 

आज २१९ रूग्णांना डिस्चार्ज तर ३२५ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर

in article

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.२९ टक्के

अहमदनगर दि ८ मार्च प्रतिनिधी

जिल्ह्यात आज २१९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७५ हजार २२७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.२९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३२५ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १७४० इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १४९, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १७३ आणि अँटीजेन चाचणीत ०३ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ३७, अकोले ०१, जामखेड ०२, कर्जत ०१, कोपरगाव ०३, नगर ग्रामीण ०८, नेवासा ०४, पारनेर ०२, राहाता ०३, राहुरी ०६, संगमनेर ४६, शेवगाव ३१, श्रीरामपूर ०१, कॅन्टोन्मेंट ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ५४, अकोले ०५ ,कर्जत ०१, कोपरगाव ०१, नगर ग्रामीण १२, नेवासा ०८, पारनेर ११, पाथर्डी ०४, राहाता १८, राहुरी १०, संगमनेर २४, शेवगाव ०२, श्रीगोंदा ०२, श्रीरामपूर ११, कॅन्टोन्मेंट ०२, इतर जिल्हा ०८ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज ०३ जण बाधित आढळुन आले. पाथर्डी ०१ आणि राहुरी ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

Read More:ॲग्री इंडिया हॅकॅथॉनमध्ये फुले रोबोला एक लाख रुपयाचे बक्षीस

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये
मनपा ७४, अकोले ०९, जामखेड ०३, कर्जत ०३, कोपरगाव ११, नगर ग्रामीण ११, नेवासा ०४, पारनेर ०६, पाथर्डी ०२, राहाता १८, राहुरी ०२, संगमनेर ४१,शेवगाव १२, श्रीगोंदा १०, श्रीरामपूर ०७, आणि इतर जिल्हा ०६ अशा रुग्णांचा समावेश आहे.

*बरे झालेली रुग्ण संख्या:७५२२७*

*उपचार सुरू असलेले रूग्ण: १७४०*

*मृत्यू:११५७*

*एकूण रूग्ण संख्या:७८१२४*

 

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here