जागतिक महिला दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय ऑनलाइन कार्यशाळेत प्राजक्ताताई धस यांचा सहभाग

प्राजक्ताताई धस

आष्टी दि ७ मार्च,प्रतिनिधी
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड व डॉ.वर्जिस कुरिअन यांच्या जन्मशताब्दी महोत्सव यांच्या संयुक्त विद्यमाने आज सोमवार दि.८ मार्च रोजी दुग्धव्यवसाय क्षेत्रातील महिला नेतृत्व या विषयावरती ऑनलाइन वेबिनार तसेच कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यशाळेत देश व बाहेरील देशातील ठराविकच दुग्धव्यवसाय क्षेत्रात काम करत असलेल्या अनुभवी महिला नेतृत्व यामध्ये काम करीत असणाऱ्या महिलांचा या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात सहभाग असणार आहे.

यामध्ये महाराष्ट्र राज्याकडून दुग्धव्यवसायांतील महिलांचे मत प्रदर्शन करण्यासाठी एकमेव प्रमुख मार्गदर्शिका म्हणून महानंद डेअरी मुंबईच्या संचालिका सौ.प्राजक्ताताई सुरेश धस यांची निवड करण्यात आली आहे.

महिलांचे आर्थिकदृष्ट्या सबलीकरण होण्याचे प्रमाण कमी असल्याने महिलांनी उपजीविकेसाठी शेती व दुग्ध व्यवसायात पुढे यावे, महिलांच्या आर्थिक सबलीकरणाला चालना मिळण्यासाठी या भागातील महिलांसमोर दुग्धव्यवसायात येणाऱ्या समस्या,अडीअडचणी यासाठी सौ.प्राजक्ताताई सुरेश धस यांचे मोठे योगदान आहे.

आणखी वाचा:श्रद्धेने 80 म्हशींचा सांभाळ करणारी उद्योजक युवती

 

त्यांनी महिलाना सशक्तीकरणासाठी प्रोत्साहन व त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आष्टी सहकारी दूध संघाच्यामार्फत त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन शिबिर राबविले आहेत.तसेच ग्रामीण भागातील महिल्याच्या अडीअडचणी जाणून त्यांच्यासाठी घरच्या जनावरांचे संगोपन, चाराच्या अडचणी, पशुखाद्य नियोजन व व्यवस्थापन तसेच दुध व्यवसाय करताना महिलांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी वर्षभर प्रशिक्षण मेळावे घेतले आहेत.

या आंतरराष्ट्रीय ऑनलाइन वेबिनार व कार्यशाळेसाठी आयआरएमएचे संचालक डॉ. उमाकांत दास,इंटरनॅशनल डेअरी फेडरेशनच्या व्यवस्थापक संचालिका कॅरोलीन इमोड,डॉ. वर्जिस कुरिअन यांच्या कन्या निर्मला कुरिअन हे प्रमुख पाहुणे म्हणून तर डॉ. जी. एस.राजोरहि दास,डॉ.आर.एस.सोधी,मिनेश शाह,के.सी.सुपेकर हे उपस्थित असणारा आहेत.
यावेळी दुग्धव्यवसायातील महिला नेतृत्वाचे अनुभव कथन करण्यासाठी राजस्थानच्या उदयपुर युनियनच्या चेअरमन डॉ. गीता पटेल,
महाराष्ट्रमधून महानंद डेअरी संचालिका सौ. प्राजक्ताताई सुरेश धस, गुजरात राज्यातून वलसाड सरोधी येथून सुधाबेन पटेल,गुजरात राज्यातून पुजाबेन चौधरी, गायत्रीबेन पटेल,मध्य प्रदेश मधून इंदोरच्या पल्लवी व्यास,पंजाब मधून लुधियाना रछपल कौर,बिहार मधून पिंकी कुमारी या राज्यातील दुग्ध व्यवसाय क्षेत्रातील प्रमुख महिला नेतृत्व मार्गदर्शन करण्यासाठी लाभणार आहेत.
या ऑनलाईन वेबिनार कार्यक्रमाचे आयोजन गुजरातचे आय.डी. ए.चेअरमन प्रा. डॉ.जे.बी.प्रजापती यांनी केले आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here