Homeमहाराष्ट्र न्यूजएमपीएससी विद्यार्थांचे आंदोलन अखेर मागे; आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळांची भेट

एमपीएससी विद्यार्थांचे आंदोलन अखेर मागे; आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळांची भेट

पुणे:

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) विविध मागण्यासाठी पुण्यातील एस एम जोशी पूल येथे सुरू असलेल्या आंदोलनाला आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळांनी काल ( दि.११) रोजी भेट देत विद्यार्थांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. त्यामुळे अकराव्या दिवशी सुरू असेलेले आंदोलन अखेर एमपीएससी विद्यार्थांचे आंदोलन मागे घेत असल्याचे आंदोलकांनी सांगितले.

एम पी एस सी पेपरफुटी प्रकरणात राज्य सरकारने न्यायालयीन चौकशीची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर आयोगाच्या अध्यक्षांनी ( विवेक भिमनवार) यांनी चौकशीसाठी नैतिकतेला प्राधान्य देत चौकशी पूर्ण होईपर्यंत पदावर कार्यरत न राहण्याचा निर्णय घेतल्याचे समाजमाध्यमातील पोस्ट (ट्विटर) द्वारे जाहीर केले आहे. या समितीत एफ डी ए चे आयुक्त तुकाराम मुंडे यांचा समावेश करण्याची आंदोलकाची मागणी मान्य केल्याचे आमदार शिवेंद्रराजे यांनी यावेळी सांगितले.

आमदार रोहित पवार म्हणाले की,अकरा दिवस चाललेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. शासनाने एकूण 15 मागण्या मान्य केल्या आहेत. यापुढेही विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी आम्ही सोबत राह, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान महारष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांनी चौकशी होऊ पर्यंत पदावर कार्यरत न राहता या कालावधीत रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
एमपीएससीची स्वायत्तता, विश्वसनीयता आणि विद्यार्थीहिताला कायम माझे प्राधान्य होते आणि यापुढेही असेल असेही त्यांनी म्हटले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments